Phone : Apple Eventच्या आधी Googleची मोठी घोषणा; या दिवशी लॉन्च होणार Pixel 7

Google Pixel 7 मध्ये दोन कॅमेरे तर Pixel 7 Pro मध्ये तीन कॅमेरे देण्यात आले आहेत.
Apple Event
Apple Eventgoogle

मुंबई : Google ने MadeByGoogle कार्यक्रमाची घोषणा केली आहे. MadeByGoogle इव्हेंट 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी Pixel 7, Pixel 7 Pro आणि Pixel Watch लाँच करणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला आपण ही उपकरणे I/O मध्ये पाहिली आहेत. Google ने यापूर्वी Pixel 7, Pixel 7 Pro आणि Pixel Watch चे टीझर दाखवले आहेत. परंतु, अद्याप या उपकरणांबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही.

गुगलने आपल्या ब्लॉगमध्ये सांगितले आहे की, हा न्यूयॉर्क शहरातील वैयक्तिक कार्यक्रम असेल. मात्र, त्यात फक्त पत्रकारच हजर राहू शकतात. हा कार्यक्रम 6 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे.

Apple Event
Upcoming Smartphone : या आठवड्यात iPhone 14 seriesसह हे फोन होणार लॉन्च

Google Pixel 7 आणि Google Pixel 7 Pro च्या डिझाइनमध्ये फारसा बदल दिसणार नाही. तथापि, त्याच्या कॅमेरा व्हिझरच्या डिझाइनमध्ये बदल करण्यात आला आहे. हे अॅल्युमिनियमचे बनलेले आहे ज्यामध्ये कॅमेऱ्यासाठी वेगळे कटआउट्स देण्यात आले आहेत. Google Pixel 7 मध्ये दोन कॅमेरे तर Pixel 7 Pro मध्ये तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. असे मानले जाते की दोन्ही फोनचा फ्रंट मागील आवृत्तीसारखाच असू शकतो.

याचे डिस्प्ले पॅनल मागील आवृत्तीप्रमाणेच आहे. एका रिपोर्टनुसार, Pixel 7 Obsidian, Lemongrass आणि Snow कलर पर्यायांमध्ये येईल. तर Pixel 7 Pro Obsidian, Hazel आणि Snow कलर पर्यायांमध्ये लॉन्च केला जाईल. गुगलने सेकंड-जेन टेन्सर चिपसेटचे नावही जाहीर केले आहे. हा चिपसेट Tensor G2 नावाने ओळखला जाईल असे कंपनीने म्हटले आहे.

Apple Event
Smartphone : स्मार्टफोनचा स्पीकर खराब झालाय का ? असा करा स्वच्छ

याशिवाय या इव्हेंटमध्ये पिक्सेल वॉच देखील लॉन्च केला जाईल. Fitbit चे हेल्थ आणि फिटनेस ट्रॅकिंग फीचर्स यात दिले जाऊ शकतात असे म्हटले जात आहे. एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की हे स्मार्टवॉच हार्ट रेट, SpO2 आणि ECG मॉनिटरिंग फीचर्ससह येऊ शकते. याच्या बॅटरीबाबत, रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, ती एक दिवसभर चार्ज करून चालेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com