"फोटॉनिक मॅक कोन'चे चित्रण करण्यात यश 

पीटीआय
सोमवार, 23 जानेवारी 2017

वॉशिंग्टन : ध्वनिपेक्षाही अधिक वेगाने जाणाऱ्या विमानामुळे ध्वनिलहरी निर्माण होतात, त्याचप्रमाणे प्रकाशकिरणांमुळेही प्रकाशलहरी निर्माण होतात. या प्रकाशलहरींचे (फोटॉनिक मॅक कोन) चित्रण करण्यात शास्त्रज्ञांना प्रथमच यश आले असून अतिवेगवान कॅमेराच्या साह्याने हे साध्य करण्यात आले आहे. 

वॉशिंग्टन : ध्वनिपेक्षाही अधिक वेगाने जाणाऱ्या विमानामुळे ध्वनिलहरी निर्माण होतात, त्याचप्रमाणे प्रकाशकिरणांमुळेही प्रकाशलहरी निर्माण होतात. या प्रकाशलहरींचे (फोटॉनिक मॅक कोन) चित्रण करण्यात शास्त्रज्ञांना प्रथमच यश आले असून अतिवेगवान कॅमेराच्या साह्याने हे साध्य करण्यात आले आहे. 
अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधकांनी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामुळे शास्त्रज्ञांना भविष्यात मेंदूमधील हालचालींची छायाचित्रे घेणे शक्‍य होणार असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. एखादी वस्तू हवेत फेकली असता, ती वस्तू तिच्यासमोरील हवा बाजूला करते. यामुळे दबाव लहरी निर्माण होऊन त्या ध्वनीच्या वेगाने सर्व दिशांना पसरतात. वस्तू ध्वनीपेक्षाही अधिक वेगाने हवेतून जात असल्यास या दबावलहरी एकमेकांवर आदळून तयार होणाऱ्या लहरींना सॉनिक बूम म्हणतात. या लहरी शंकूच्या आकारात मर्यादित असतात. अतिवेगवान प्रकाशलहरीही अशाच प्रकारच्या शंकूच्या आकारातील लहरी तयार करतात, असा शास्त्रज्ञांचा पूर्वीपासून अंदाज होता. आता प्रथमच या लहरी टिपता आल्याने ते सिद्ध झाले आहे. नव्या कॅमेराद्वारे एका सेकंदात एक अब्ज छायाचित्रे काढता येतात. 

कसा केला प्रयोग? 
संशोधकांनी एका अरुंद नळीची रचना करून ती शुष्क बर्फाच्या वाफेने भरला. सिलीकॉन रबर आणि ऍल्युमिनियम ऑक्‍साइड पावडरच्या मिश्रणापासून तयार केलेल्या पत्र्यांनी ही नळी झाकून टाकली. यानंतर त्यांनी या नळीमधून हिरवा लेझर किरण अनेकदा सोडला. या प्रत्येक किरणाचा कालावधी केवळ सेकंदाच्या एक हजार अब्जावा भाग इतका होता. लेझरमुळे नळीमधील शुष्क बर्फाची वाफ पसरली गेली आणि त्यामुळे निर्माण झालेल्या प्रकाशलहरी बाहेरच्या पत्र्यांवर आदळल्या. त्याचा अभ्यास केला असता वरील निष्कर्ष निघाला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "photnic mack cone illustration renown logging