
मॅकडोनॉघ उल्का, ४.५६ अब्ज वर्षे जुनी, जॉर्जियातील घरावर कोसळली.
ती मंगळ-गुरू लघुग्रह पट्ट्यातून आली आणि ‘एल’ कॉन्ड्राइट प्रकारची आहे.
संशोधनातून अवकाशीय धोक्यांचा आणि विश्वाच्या इतिहासाचा अभ्यास होणार आहे.
अमेरिकेतील मॅकडोनॉघ येथे २६ जूनला अवकाशातून आलेली एक उल्का थेट एका घराच्या छतावर पडला. या आश्चर्यकारक घटनेने वैज्ञानिक आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष वेधले आहे. या उल्केला आता अधिकृतपणे ‘मॅकडोनॉघ उल्का’ असे नाव देण्यात आले असून, ती पृथ्वीपेक्षा जुन्या, म्हणजेच ४.५६ अब्ज वर्षांपूर्वीच्या अवकाशातील दगड आहे, असे युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जिया (UGA) च्या संशोधकांनी निश्चित केले आहे.