
नासाच्या अंतराळवीर डॉन पेटीट यांनी गंगा डेल्टाचा दुर्मिळ फोटो अंतराळातून टिपला.
निअर-इन्फ्रारेड तंत्रामुळे डेल्टामधील भूप्रदेश आणि वनस्पती स्पष्टपणे उठून दिसतात.
हे फोटो पर्यावरण जागृती आणि पृथ्वीच्या सौंदर्याकडे नवीन दृष्टिकोन देणारी आहे.
Ganga River Delta Video : नासाचे अंतराळवीर डॉन पेटिट यांनी अंतराळातून टिपलेले गंगा नदीच्या खाडीचे एक आश्चर्यकारक छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (ISS) त्यांच्या एक्स्पिडिशन 73 मोहिमेदरम्यान काढलेले हे नियर-इन्फ्रारेड छायाचित्र जगातील सर्वात मोठ्या नदी खाडीची अनोखी झलक जगासोबत शेयर केली. भारताच्या पूर्व भाग आणि बांगलादेशात पसरलेली ही खाडी तिच्या सुपीक जमिनी आणि जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. या छायाचित्राने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले असून, विज्ञान आणि सौंदर्य यांच्या संगमाची प्रशंसा होत आहे.