‘प्ले स्टोअर’चे नवे व्हर्जन google

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

ॲण्ड्रॉईड फोनसाठी ज्या ठिकाणाहून ॲप डाऊनलोड केले जातात, ते ‘गुगल प्ले स्टोअर’च (Google Play Store) आता अपडेट झाले आहे. याचे V7.8.74 हे नवे व्हर्जन आलेले आहे. सध्या हे व्हर्जन काही मोजक्‍या उपकरणांवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच गुगलने ‘युजर इंटरफेस एलिमेंट’द्वारे या ॲपच्या लूकमध्ये बदल केला आहे. शिवाय त्याला ऑक्‍युपेशनल थेरपी (OT) सपोर्टसह इन्स्टंट ॲप्सशी जोडले आहे; मात्र या सुविधा युजर्ससाठी खुल्या केलेल्या नाहीत. नवीन व्हर्जनमध्ये त्या उपलब्ध केल्या जाण्याची शक्‍यता आहे.

काही दिवसांपूर्वी ‘रेन्समवेअर’ या व्हायरसचा हल्ला झाल्यानंतर ‘गुगलने प्ले’वरची २० ॲप्स हटवली होती. तसेच युजर्सनाही ही ॲप्स डाऊनलोड केली असल्यास डिलीट करण्याची सूचना करण्यात आली होती. याशिवाय Dubbed Judy नावाच्या ॲपमध्ये मालवेअर आढळले होते. हे ॲप डाऊनलोड करणाऱ्या तीन कोटी युजर्सना याचा फटका बसला होता. 

खरे तर नवीन ॲप्स येण्यापूर्वी ते स्कॅन करण्याची यंत्रणा प्ले स्टोअरमध्ये कार्यरत आहे; मात्र हा मालवेअर स्कॅन करण्यात ही यंत्रणा कुचकामी ठरली. हे मालवेअर प्ले स्टोअरमध्येही शिरकाव करण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे नवीन व्हर्जनमध्ये गुगलकडून व्हायरसपासून ‘प्ले स्टोअर’ अधिक सुरक्षित करण्यावर भर दिल्याचे समजते. येत्या काही दिवसांत नवीन व्हर्जन सर्व ॲण्ड्रॉईड युजर्ससाठी खुले होईल. 

प्ले स्टोअरचे नवीन व्हर्जन अपडेट करण्यासाठी युजर्सना त्यांच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन हे ॲप डाऊनलोड करण्याची परवानगी घ्यावी लागेल. तसेच ‘अननोन सोर्स’ला (Unknown Source) ‘Enable’ करावे लागेल. 
अपडेट व्हर्जनची फाईल (APK) खालील लिंकवरून डाऊनलोड करता येईल.
http://www.apkmirror.com/apk/google-inc/google-play-store/google-play-st...४k.dpuf

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: play store new version google