PM Narendra Modi : देशात 5G आलं तरी चर्चा फक्त मोदींच्या चष्माचीच; काय आहे विशेष? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi
PM Narendra Modi : देशात 5G आलं तरी चर्चा फक्त मोदींच्या चष्माचीच; काय आहे विशेष?

PM Narendra Modi : देशात 5G आलं तरी चर्चा फक्त मोदींच्या चष्माचीच; काय आहे विशेष?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5G सोबत इंडिया मोबाईल काँग्रेससारख्या नव्या तंत्रज्ञानांचं उद्घाटनही केलं. यावेळी त्यांनी लावलेला चष्मा चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. पण हा चष्मा काही सामान्य चष्मा नाही, किंवा साधा गॉगल नाही. हा चष्मा म्हणजे भविष्यातल्या हायटेक तंत्रज्ञानाचं केवळ एक छोटंसं उदाहरण आहे.

हेही वाचा: तीन तासांचा movie ३ सेकंदात डाऊनलोड; 5G चे फायदे काय?

हा चष्मा मेटावर्स टेक्नॉलॉजी वेब ३ असलेला आहे. मेटावर्स हे एक मायावी जग आहे. या जगामध्ये तुमचं अस्तित्व जरी आभासी असलं, तरी तुम्ही करत असलेली कृती मात्र खरी असणार आहे. ब्लूमबर्ग इंटेलिजन्सच्या अंदाजानुसार २०२४ पर्यंत मेटावर्सचं मार्केट जवळपास ८०० बिलियन डॉलर्सपर्यंत वाढणार आहे. बँक ऑफ अमेरिकेने मेटावर्सला त्यांच्या १४ टेक्नॉलॉजी मध्ये स्थान दिलं आहे. या मेटावर्स मुळे आपल्या आयुष्यात क्रांतिकारी बदल होऊ शकतात.

हेही वाचा: 5G In India : 5G मुळं गावागावांत क्रांती होणार - नरेंद्र मोदी

मेटावर्सच्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तुम्ही एका डिजिटल जगात प्रवेश करता. म्हणजे तुमचं शरीर तिथं नसतं, पण तुमचं एक रुप त्याठिकाणी अस्तित्वात असतं. हे एक वेगळं जग आहे, ज्यात तुमची ओळखही वेगळीच असणार आहे. मेटावर्स हे ऑगमेंटेड रिअलिटी, व्हर्च्युअल रिअलिटी, मशिन लर्निगं, ब्लॉकचेन टेक्नोलॉजी आणि आर्टिफिशल इंटेलिजन्स अशा अनेक तंत्रज्ञानापासून बनलेलं आहे.