PMV EaS-E: भारतीय सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च; फक्त 2,000 रुपयांमध्ये करता येईल बुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PMV EaS-E

PMV EaS-E: भारतीय सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च; फक्त 2,000 रुपयांमध्ये करता येईल बुक

भारतीय इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप PMV इलेक्ट्रिकने भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. या कारला EAS-E असे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही देशातील सर्वात छोटी आणि स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. PMV इलेक्ट्रिक ने EAS-e लाँच केले आहे. 4.79 लाख (एक्स-शोरूम) रुपये किमतीत ही कार खरेदी करू शकता. मात्र, ही किंमत पहिल्या 10,000 ग्राहकांसाठी आहे. यानंतर कंपनी त्याची किंमत वाढवू शकते.

हेही वाचा : Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

विशेष म्हणजे, PMV Eas-E चे सध्या भारतात ईव्ही सेगमेंटमध्ये कोणतेही प्रतिस्पर्धी नाहीत. ही कार एमजी मोटरच्या आगामी एअर ईव्हीशी स्पर्धा करेल. एमजी मोटारची कार ही पुढील वर्षी 5 जानेवारीला लॉन्च होणार आहे. कंपनीने अधिकृत लॉन्च होण्यापूर्वीच ईव्हीसाठी सुमारे 6,000 बुकिंग प्राप्त केले आहेत. ही इलेक्ट्रिक कार पीएमव्हीच्या अधिकृत वेबसाइटवरून फक्त 2,000 रुपयांमध्ये बुक केली जाऊ शकते.

कार किती सीटर आहे?

PMV EaS-E ही देशातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार आहे. यात एका वेळी दोन प्रौढ आणि एक मूल बसू शकते. कार शहरात वापरण्यासाठी डिझाइन केली आहे. त्याची लांबी 2,915 मिमी, रुंदी 1,157 मिमी आणि उंची 1,600 मिमी आहे. कारचा व्हीलबेस 2,087 मिमी आहे तर ग्राउंड क्लीयरन्स 170 मिमी आहे. तसेच, ईव्हीचे कर्ब वजन सुमारे 550 किलो आहे.

Eas-E इलेक्ट्रिक कारच्या फिचर्सबद्दल सांगायचे तर, यात डिजिटल इन्फोटेनमेंट सिस्टम, एक यूएसबी चार्जिंग पोर्ट, एअर कंडिशनिंग, रिमोट कीलेस एंट्री आणि रिमोट पार्क असिस्ट, क्रूझ कंट्रोल आणि एअरबॅग्स तसेच सीट बेल्ट्स मिळतील. याशिवाय, कारमध्ये वेगवेगळ्या राइडिंग मोड्स, पाय-फ्री ड्रायव्हिंग, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, ऑनबोर्ड नेव्हिगेशन, म्युझिक कंट्रोल आणि कनेक्टेड स्मार्टफोनवरून कॉल कंट्रोलची सुविधा देखील आहे.

कारचा टॉप स्पीड किती आहे?

यात एलईडी लाईट, स्लिम एलईडी लाईट मिळतील. इलेक्ट्रिक कारच्या पॉवर आउटपुटबद्दल बोलायचे झाल्यास, यात 13 hp पॉवर आणि 50 Nm पीक टॉर्क मिळेल. ते 70 किमी प्रतितास वेगाने धावू शकते आणि केवळ 5 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग वाढवू शकते.

PMV EAS-E मायक्रो इलेक्ट्रिक कारमध्ये 3 प्रकारचे बॅटरी पॅक पर्याय उपलब्ध आहेत. एका चार्जवर ते 200 किलोमीटरपर्यंत धावू शकते. कंपनीचा दावा आहे की त्याची सर्वात कमी रेंज सुमारे 120 किमी असेल. हे चार तासांपेक्षा जास्त वेळेत पूर्णपणे रिचार्ज केले जाऊ शकते. मायक्रो कार कोणत्याही 15A चार्जरने चार्ज केली जाऊ शकते. कंपनी कारसोबत 3 kW चा एसी चार्जर देखील देत आहे.

टॅग्स :IndiaTechnologyEcars