esakal | पॉकेट फ्रेंडली साइन मशीन
sakal

बोलून बातमी शोधा

Jaquet-Droz-signing-machine

पॉकेट फ्रेंडली साइन मशीन

sakal_logo
By
वृत्तसंस्था

अनेक कागदपत्रांवर आपल्याला स्वाक्षरी करण्याची वेळ आली की ती स्वाक्षरी थोडीफार बदलते किंवा महत्त्वाच्या व्यक्तिंना तर अनेकदा स्वाक्षरी देण्याची वेळ येते. मग अशा वेळी हे नवीन 'पॉकेट फ्रेंडली साइन मशीन' तुमच्या उपयोगी पडणार आहे. 

स्वित्झर्लंडमधील घड्याऴे तयार करणारे ज्केत डोझ यांनी 'पॉकेट फ्रेंडली साइन मशीन' तयार केले आहे. मागच्या महिन्यात पार पडलेल्या 'बासेलवर्ल्ड वॉच शो'मध्ये त्यांनी हे मशीन सादर केले. 

या मशीनला पेनसाठी एक 'स्लॉट' आहे. त्यामध्ये बटन दाबल्यानंतर पेन बाहेत येतो आणि स्वाक्षरी करतो. परंतु, तुमची स्वाक्षरी या मशीनने करण्यासाठी स्वाक्षरी कंपनीकडे देणे बंधनकारक आहे. त्यानुसार कंपनी तुमच्यासाठी कस्टमाईज मशीन बनवून देते. पेपरवर मशीन ठेवल्यावंतर ते सुमची स्वाक्षरी करते. तसेच या मशिनमध्ये एक कोड आहे ज्यामुळे तुमचे हे मशीन चोरिला गेले अथवा गहाळ झाले तरी कोणी तुमची स्वाक्षरी करु शकणार नाही. 

loading image