Slim 5G Smartphone : हा स्लीम 5G स्मार्टफोन घेणं तुमचंही असणार ड्रीम, मिनिटांत फूल चार्जिंग अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Slim 5G Smartphone

Slim 5G Smartphone : हा स्लीम 5G स्मार्टफोन घेणं तुमचंही असणार ड्रीम, मिनिटांत फूल चार्जिंग अन्...

POCO ने भारतात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे, ज्याचे नाव Poco X5 Pro 5G आहे. फोन डॉल्बी व्हिजन, स्नॅपड्रॅगन 778G चिपसेट, 67W फास्ट चार्जर, स्टिरिओ स्पीकर आणि बरेच काही सह AMOLED डिस्प्ले ऑफर करतो. फोनची किंमतही खूप कमी आहे. दुसरीकडे, डिझाइनबद्दल बोलायचे तर ते खूपच स्टाइलिश आहे. जाणून घेऊया Poco X5 Pro 5G ची किंमत आणि वैशिष्ट्ये.

Poco X5 Pro Specifications

Poco X5 Pro पंच होल डिस्प्ले डिझाइनसह येतो. फोनमध्ये 120hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा डिस्प्ले आहे. हा पोकोचा सर्वात पातळ फोन असल्याचा कंपनीचा दावा आहे. हा फोन तीन रंगांमध्ये (पिवळा, काळा आणि निळा) लॉन्च करण्यात आला आहे. फोनला IP53 रेटिंग देखील आहे आणि स्क्रीन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 द्वारे प्रोटेक्टेड आहे.

बॅटरी

Poco X5 Pro क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 778G चिपसेटद्वारे समर्थित आहे. नुकत्याच लाँच झालेल्या Realme 10 Pro+ मध्ये आढळलेल्या MediaTek Dimensity 1080 SoC पेक्षा ते वेगवान असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. फोनमध्ये 67W फास्ट चार्जर सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे. 5W रिव्हर्स चार्जिंगसाठी देखील सपोर्ट आहे. (Smartphone)

जबरदस्त कॅमेरा

Poco X5 Pro मध्ये ट्रिपल कॅमरा सेटअप दिलेला आहे, यात108MP का प्रायमरी कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा वाइड आणि 2MP का मायक्रो लेंस आहे. तर फ्रंट कॅमेरा 16MP च्या सेंसरसह आहे.