
चार्जिगचं नो टेन्शन, हे स्वस्तात मस्त नेकबॅंड राहातात 41 दिवस चार्ज
Portronics ने भारतात दोन नवीन ऑडिओ प्रोडक्ट्स लाँच केली आहेत. दोन्ही नवीन इयरफोन्स नेकबँड डिझाइनसह आले आहेत. जे वायरलेस आहेत आणि हार्मनी सीरीज अंतर्गत हे लॉंच करण्यात आले आहेत. या दोन्ही इयरफोन्सना Harmonics 250 आणि Harmonics X1 असे नाव देण्यात आले आहे. चला तर मग या दोन नेकबँड्सची खासियत जाणून घेऊया:
Portronics Harmonics 250 Wireless Stereo Neckband
हे earphones ब्लॅक आणि ग्रीन या दोन कलर व्हेरियंटमध्ये येतात, हे 2 तासांत पुर्ण चार्ज होतात आणि एकदा पूर्ण चार्ज केल्यास हे वायरलेस इअरफोन्स 60 तासांपर्यंत ऑडिओ प्लेबॅक टाईम देतात. तसेच हे 1,000 तासांचा (41 दिवस) स्टँडबाय टाइम देखील देतात. यामध्ये तुम्हाला 800mAh बॅटरी पॅक मिळतो जो 15 दिवस टिकतो. Harmonix 250 मध्ये लेटेस्ट ब्लूटूथ 5.0 टेक्नोलॉजी ऑफर करते आणि अर्गोनॉमिक डिझाइन देखील बनू शकते आणि त्याचे वजन फक्त 58 ग्रॅम आहे. तसेच हे व्हॉईस असिस्टंटला देखील सपोर्ट करते ज्यामध्ये तुम्हाला कॉल, म्यूजीक इत्यादीसाठी मदत करते. नेकबँडच्या इअरपीसला मॅगनेट जोडलेले आहे जेणेकरून त्यांचा गुंता होत नाही.
हेही वाचा: मारुती बलेनोची क्रेझ! लॉच होताच 'या' बाबतीत बनली नंबर 1 कार
Portronics Harmonics X1 Wireless Sports Neckband
कंपनीने ब्लूटूथ 5.0 आणि खास डिझाइनसह हार्मोनिक्स X1 तयार केले आहे. यामध्ये 150mAh बॅटरी दिली आहे जी 15 तासांपर्यंत ऑडिओ प्लेबॅक आणि 55 तासांपर्यंत स्टँडबाय टाइम देखील देते. Harmonix X1 मध्ये वीज-बचत करणारे तंत्रज्ञान देण्यात आले आहे. कलर ऑप्शन्सबद्दल बोलायचे झाल्यास हे लाल, काळा आणि हिरवा अशा अनेक रंगांच्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहेत.
हेही वाचा: Realme Narzo 50 भारतात लॉन्च, मिळेल 33W फास्ट चार्जिंग, 50MP कॅमेरा
दोन्ही Neckbands ची किंमत
हे पोर्टोनिक्स हार्मोनिक्स 250 आणि हार्मोनिक्स एक्स1 कंपनीच्या अधिकृत वेबसाइट, Amazon India आणि इतर आघाडीच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरमधून खरेदीसाठी उपलब्ध आहेत. Portronics Harmonics 250 ची किंमत 1,199 रुपये आहे तर Harmonics X1 ची किंमत 999 रुपये आहे. दोन्ही वायरलेस इयरफोन 12 महिन्यांची वॉरंटी देतात.
हेही वाचा: युक्रेनमध्ये अडकली मुलगी, PMO च्या नावाने असाहाय आईची फसवणूक?
Web Title: Portronics Launches New Harmonics 250 And Harmonics X1 Neckband Earphones Check Price
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..