Solar Storm : पृथ्वी आलीये धोक्यात ; सौरवादळ आलं जवळ,ब्लॅकआउटच्या शक्यतेने वाढली चिंता

June Solar Eruption : X-class हे सर्वात शक्तिशाली सूर्यस्फोट, स्फोट पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर करणार परिणाम
Solar Storm Alert: Earth Faces Potential Blackouts
Solar Storm Alert: Earth Faces Potential Blackoutsesakal

Solar Strom : नुकतीच ग्रहांची परेड म्हणजेच ग्रहसंयोगाला सुरुवात झाली आहे. ग्रहसंयोग म्हणजे पृथ्वीवरून पाहताना सूर्यमालेतील ग्रह एका रांगेत किंवा जवळजवळ एका रांगेत असल्यासारखे दिसतात. हा संयोग वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो. यावेळी बुध, गुरू, शनी, मंगळ, युरेनस आणि नेपच्यून हे ग्रह एकत्र येणार होते. या ग्रह संयोगादरम्यानच सूर्याच्या बाबतीत एक घटना घडलीये.

नुकताच सूर्यावर एक शक्तिशाली स्फोट झाला होता. या स्फोटामुळे पृथ्वीवर काही काळासाठी शॉर्टवेव्ह रेडियोमध्ये व्यत्यय आला होता. मात्र, चिंता करण्याची गरज नाही कारण या स्फोटाच्या वेळी बाहेर पडलेले 'कोरोनल मास इजेक्शन' (CME) थेट पृथ्वीच्या दिशेने आले नाही.

Solar Storm Alert: Earth Faces Potential Blackouts
NASA ने शेअर केले Black Hole चे 'हे' फोटो पाहून व्हाल थक्क

अमेरिकेच्या अंतराळ हवामान संकेतस्थळ spaceweather.com नुसार, 27 मे रोजी सूर्यावरील 'एआर3664' नावाच्या स्पॉटपासून हा स्फोट झाला होता. हा स्फोट X2.8 इतका तीव्र होता, ज्यामुळे तो गेल्या काही वर्षांमधील सर्वात मोठा सूर्यस्फोट ठरला. NASA च्या माहितीनुसार, X-class हे सर्वात शक्तिशाली सूर्यस्फोट असतात. यात सूर्यावर स्फोट होऊन ऊर्जा, प्रकाशाचे कण आणि अतिशय वेगवान चार्ज्ड कण अंतराळात पसरतात.

या स्फोटाच्या वेळी बाहेर पडलेले CME थेट पृथ्वीच्या दिशेने न येताना सूर्याच्या दुसऱ्या बाजूने बाहेर पडले. त्यामुळे पृथ्वीवर त्याचा थेट परिणाम झाला नाही. परंतु स्फोटाच्या विकिरणामुळे पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या थरात असलेल्या कणांवर परिणाम झाला होता. त्यामुळे काही काळासाठी शॉर्टवेव्ह रेडियो सिग्नलमध्ये व्यत्यय आला होता.

Solar Storm Alert: Earth Faces Potential Blackouts
AI Teacher : या AI शिक्षिकेने जिंकलं विद्यार्थ्यांचं मन ; निती आयोगाचा प्रकल्प आसाममध्ये लाँच

सूर्यशास्त्रज्ञांची मात्र चिंता वाढली आहे. कारण जूनच्या 4 ते 6 तारखेच्या आसपास AR3664 पुन्हा एकदा पृथ्वीच्या दिशेने वळणार आहे. त्यावेळी होणारे स्फोट पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर परिणाम करू शकतात अशी शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com