Solar Storm Explain : सूर्यावर भीषण स्फोट अन् पृथ्वीवर गंभीर परिणाम; सर्वात मोठे सौर वादळ धडकण्याची शक्यता, पाहा फोटो

Solar Storm Risk to earth NASA Warns : सूर्याच्या प्रचंड स्फोटामुळे पृथ्वीवर तीव्र सौर वादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Solar Storm Risk to earth NASA Warns
Solar Storm Risk to earth NASA Warnsesakal
Updated on

सूर्यावरून आलेल्या जबरदस्त स्फोटामुळे पृथ्वीला १ जून रोजी मोठ्या सौर वादळाचा फटका बसला आहे, अशी माहिती नासाने आणि NOAA ने दिली आहे. दोन्ही अंतराळ संस्थांच्या अहवालांमध्ये यंदा प्रथमच एकमताने सांगितले गेले आहे की हे सौर वादळ थेट पृथ्वीच्या दिशेने येत आहे. त्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञ आणि अंतराळ निरीक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

या स्फोटातून निघालेल्या कोरोनल मास इजेक्शन (CME) नावाच्या प्रचंड सौर उत्सर्जनाने पृथ्वीच्या दिशेने झेप घेतली आहे. CME हे सौर वातावरणातून बाहेर फेकले जाणारे ऊर्जा आणि कणांचे ज्वालामुखीप्रमाणे स्फोटक मिश्रण असते. ३१ मे रोजी सौरपिंडावर असलेल्या 'सनस्पॉट 4100' या जागेवरून M8.2 श्रेणीचा सौर स्फोट झाला, जो जवळजवळ तीन तास चालला. ही वेळ आणि ऊर्जा यामध्ये अत्यंत दुर्लभ घटना मानली जाते.

solar strom earth photos
solar strom earth photosesakal

या स्फोटामुळे निर्माण झालेल्या CME ची गती ताशी १९३८ किमी इतकी आहे, जी सौर चक्र २५ मधील सर्वात जलद वेगांपैकी एक मानली जात आहे. यामुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. G4 श्रेणीचे तीव्र भूचुंबकीय वादळ १ जूनच्या दुपारी ते संध्याकाळच्या सुमारास पृथ्वीला धडकू शकते, असे अंदाज व्यक्त करण्यात आला होता. हे वादळ २ जूनपर्यंत सुरू राहू शकते.

Solar Storm Risk to earth NASA Warns
Sanchar Saathi : हरवलेले अन् चोरी झालेले मोबाईल कुरियरने येतायत घरी; नेमका विषय काय? बघा एका क्लिकवर..
solar strom earth photos
solar strom earth photosesakal

अरोरा लाईट्स भारतात दिसतील का?

या वादळामुळे उत्तर युरोप, अमेरिका आणि इतर थंड हवामान असलेल्या भागांमध्ये अरोरा लाईट्स (Northern Lights) दिसण्याची शक्यता आहे. जर CME चा चुंबकीय प्रवाह योग्य पद्धतीने पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी एकत्रित झाला, तर सामान्यतः ध्रुवप्रदेशात दिसणारे हे दिव्य दृश्य कमी अक्षांशांमध्ये म्हणजेच मध्य युरोप, अमेरिका आणि कदाचित हिमालयीन भागांमध्येही दिसू शकते.

Solar Storm Risk to earth NASA Warns
Whatsapp News : जुने मोबाईल वापरणाऱ्यांना धक्का! 1 जूननंतर 'या' 14 मोबाईलवर WhatsApp बंद होणार, तुमचा फोन यादीत आहे का? पाहा

काय धोका निर्माण होऊ शकतो?

या प्रकारच्या तीव्र सौर वादळांमुळे

  • वीज ग्रीड्सवर परिणाम होऊ शकतो.

  • सॅटेलाइट आणि अंतराळ यंत्रणांमध्ये बिघाड निर्माण होऊ शकतो.

  • GPS आणि कम्युनिकेशन सिग्नल्स अचूकतेत अडचण येऊ शकते.

  • हवाई वाहतूक व्यवस्थांवरही परिणाम होऊ शकतो.

म्हणूनच जगभरातील महत्त्वाच्या यंत्रणा सतर्क राहिल्या आहेत.

Solar Storm Risk to earth NASA Warns
Spam Call Block : मिनिटांत कायमचे बंद करा फसवे स्पॅम कॉल; तुमच्या मोबाईलमध्ये लपलेलं 'हे' फीचर वापरून बघाच

या सौर स्फोटांमधून पृथ्वीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून भविष्यातील मोठ्या सौर आपत्तींना तोंड देण्याचे तंत्र विकसित करता येते. शास्त्रज्ञ म्हनाले, "सूर्याच्या या अनपेक्षित वागणुकीचा अभ्यास ही भविष्याच्या सुरक्षिततेसाठी गुंतवणूक आहे."

जरी हे वादळ मे २०२४ च्या ऐतिहासिक वादळाइतके तीव्र नसले, तरी ते २०२५ मधील सर्वात मोठ्या घटनांपैकी एक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे आकाशातील दृश्य पाहण्यासाठी आणि त्याचबरोबर संभाव्य धोके टाळण्यासाठी सर्वांनी जागरूक राहणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com