

rising premium two wheeler demand in maharashtra yamaha insights 2025 hybrid electric growth
esakal
अरविंद रेणापूरकर: सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ७ : भारतासह महाराष्ट्रातील दुचाकी बाजारात गेल्या काही वर्षांत मोठे बदल दिसून येत आहेत. ग्राहकांची पसंती, तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे झुकणारा कल पाहता या क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत असल्याचे मत यामाहा मोटर इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष (विक्री) रवींदर सिंह यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. त्यांच्या मते, सध्या भारतीय बाजारात ‘प्रीमियमायझेशन’ हा महत्त्वाचा ट्रेंड ठरत आहे. विशेषतः शहरी तसेच निमशहरी भागातील तरुण ग्राहक अधिक कार्यक्षम, आकर्षक डिझाईन असलेली आणि प्रगत तंत्रज्ञानयुक्त दुचाकी वाहनांना पसंती देत असल्याचे त्यांनी सांगितले.