युझर्सचा डेटा धोक्यात; Telegram बनलं हॅकर्सचं नवं हत्यार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 January 2021

इंटरनेट युझर्सच्या डेटा प्रायव्हसीबाबत सध्या चर्चा सुरु आहे.

नवी दिल्ली : इंटरनेट युझर्सच्या डेटा प्रायव्हसीबाबत सध्या चर्चा सुरु आहे. व्हॉट्सएपच्या नव्या प्रायव्हसी धोरणामुळे ही चर्चा जोरात सुरु आहे. या दरम्यानच आता काही हुशार हॅकर्सनी मॅसेजिंग ऍप Telegram ला एका नव्या हत्यारासारखे वापरणे सुरु केलं आहे. काही रिपोर्ट्सनुसार, हॅकर्स टेलिग्राम ऍपच्या बॉटचा वापर करुन फेसबुक युझर्सच्या कॉन्टॅक्ट डिटेल्सना ऍक्सेस करत आहेत. यातून त्या युझर्सना निशाणा साधला जात आहे ज्यांचा डेटा दोन वर्षांपूर्वी झालेल्या डेटा ब्रीचमध्ये हॅकर्सच्या हाती लागला होता.

रिसर्चरनी पटवली अनसिक्यूअर्ड सर्व्हरची ओळख
2019 मध्ये एका रिसर्चरने एका अनसिक्यूअर्ड सर्व्हरची ओळख पटवली होती. या सर्व्हरवर जवळपास 42 कोटी रेकॉर्ड होते. यामध्ये अमेरिका आणि ब्रिटनच्या 15 कोटी युझर्सचा डेटा देखील होता. असं म्हटलं जातंय की, यासाठी हॅकर्सनी टेलिग्राम ऍपच्या बॉटचा वापर केला होता जेणेकरुन सहजतेने फेसबुक युझर्सच्या कॉन्टॅक्ट्स डिटेल्सना ऍक्सेस करता येईल.  

हेही वाचा - TikTokसह 59 चिनी अ‍ॅप्सवर भारतात 'पर्मनंट' बंदी​
वापरली जाते 'रिव्हर्स सर्च' ट्रिक
रिपोर्टमध्ये म्हटलं गेलंय की हा बॉट चलाखीने युझर्सला फेसबुक युझर आयडीच्या बदल्यात तो फोन नंबर एंटर करायला लावतात, ज्याबद्दला त्यांना माहिती हवी असते. याशिवाय हा बॉट एकप्रकारच्या रिव्हर्स सर्च ट्रिकमधून फेसबुक आयडीच्या माध्यमातून युझर्सच्या नंबरला ऍक्सेस करतात. एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे की, यामध्ये 40 कोटीहून अधिक युझर्सचा डेटा असुरक्षित डेटाबेसचा भाग बनला आहे. 
बॉटकडे 19 देशांतील युझर्सचा डेटा
असा दावा केला जातोय की, हा बॉट 19 देशातील युझर्सचा डेटा उपलब्ध करवून देतो. बॉटवरुन केल्या गेलेल्या एका टेस्टमध्ये समजलं आहे की, हा बॉट त्या युझर्सच्या नंबर्सना ऍक्सेस करु शकत नाही जे लोक सामान्यत: आपला नंबर प्रायव्हेट ठेवतात.
2019 च्या आधी बनलेल्या FB अकाऊंटला जास्त धोका
रिपोर्ट्सनुसार, फेसबुकने दावा केलाय की, हा बॉट त्या फेसबुक आयडींबाबत निष्क्रिय आहे ज्यांना डेटा लीकचा धोका संपल्यानंतर तयार केलं गेलं होतं. मात्र, त्यात अशा अकाऊंटबद्दल कोणतीही माहिती दिली गेली नव्हती,ज्यांना 2019 पूर्वी बनवली गेली होती. अशा पार्श्वभूमीवर हे अकाऊंट हॅकर्सच्या टार्गेटवर आहेत कारण यांना ते सहजतने टेलिग्रामच्या माध्यमातून ऍक्सेस करु शकतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: privacy telegram app bot helping hackers to access facebook users contact