
Free WiFi Fraud Alert Public Hotspot Scams During Festive Season
esakal
सणासुदीच्या धुमाकूळात शॉपिंग मॉल, रेल्वे स्टेशन, विमानतळ आणि हॉटेलमध्ये मोफत वाय-फायचा वापर करताय? तर मग थांबा.. हा सोयीचा फ्री मायाजाल तुम्हाला फसवणुकीच्या दरीत ओढू शकतो. सरकारच्या सायबर सुरक्षितता यंत्रणेच्या तज्ज्ञांनी फ्री वायफाय फ्रॉड बाबत रेड अलर्ट जारी केला आहे. लाखो लोकांचे बँक खाते, ईमेल आणि वैयक्तिक डेटा हॅकर्सच्या हातात गेले आहेत. UGC ने विद्यार्थ्यांना विशेष सूचना दिल्या सार्वजनिक वायफायवर पर्सनल अकाउंट्स उघडू नका..चला जाणून घेऊया हा धोका कसा टाळायचा आणि सुरक्षित राहायचं.