PTron Earbuds: अवघ्या ९९९ रुपयात लाँच झाले शानदार इयरबड्स, मिळेल ३२ तासांची बॅटरी लाइफ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Earbuds

PTron Earbuds: अवघ्या ९९९ रुपयात लाँच झाले शानदार इयरबड्स, मिळेल ३२ तासांची बॅटरी लाइफ

PTron Bassbuds Nyx Launched: भारतीय इलेक्ट्रॉनिंक मॅन्यूफॅक्चरर कंपनी PTron ने आपल्या नवीन PTron Bassbuds Nyx या शानदार इयरबड्सला लाँच केले आहे. PTron Bassbuds Nyx ला कंपनीने ट्रांसपरेंट डिझाइनसह लाँच करण्यात आले आहे. बड्सला वॉटर रेसिस्टेंट रेटिंग देखील मिळाले आहे. PTron Bassbuds Nyx च्या चार्जिंग केसवर एलईडी डिस्प्ले असून, यावर बॅटरीबाबत माहिती मिळते. बड्सला ड्यूल कलर डिझाइनमध्ये सादर करण्यात आले आहे.

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

PTron Bassbuds Nyx वापरताना शानदार ऑडिओ एक्सपीरियन्स मिळेल, असा दावा कंपनीने केला आहे. यामध्ये १० एमएमचे ड्राइव्हर दिले आहे. यात ५० एमएस लो लेटेंसी फीचर देखील मिळते. तसेच, हेव्ही बास आणि बेस्ट ट्यूनिंग मिळेल. तुम्ही इयरबड्सला फोनसोबतच लॅपटॉप आणि टीव्हीसोबत देखील वापरू शकता.

हेही वाचा: Smartphone Apps: फोनमधील 'हे' ४ अ‍ॅप्स त्वरित करा डिलीट, अन्यथा तुमचे बँक खाते होईल रिकामे

दमदार बॅटरी लाईफसह येतात पीट्रॉनचे इयरबड्स

pTron Bassbuds Nyx मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.१ चा सपोर्ट मिळतो. सोबतच, टच कंट्रोल देखील दिला आहे. यात मोनो आणि स्टीरियो मोड देखील आहेत. कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्जमध्ये बड्सला ९ तास वापरू शकता. तर चार्जिंग केससोबत एकूण ३२ तासांची बॅटरी लाईफ मिळते.

वॉटर रेसिस्टेंटसाठी PTron Bassbuds Nyx ला आयपीएक्स४ रेटिंग मिळाले आहे. पीट्रॉनच्या या बड्सची मूळ किंमत १,२९९ रुपये आहे. परंतु, लाँचिंग ऑफर अंतर्गत तुम्ही फक्त ९९९ रुपयात खरेदी करू शकता.

टॅग्स :Technology