सरकारने PUBG Mobile game बॅन का नाही केला ?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

मागील काही दिवसांपासून भारत-चीन या दोन्ही देशांमध्ये ताण तणाव सुरू आहे.अशातच केंद्र सरकारने हा तणाव सुरू असताना एक चांगला  निर्णय घेतला आहे. त्यासाठी  भारताने चीनवर थेट ‘डिजिटल स्ट्राईक’ चा हमला केला. म्हणजे मोदी सरकारने नुकत्याच टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. चीनशी संबंधित असलेल्या ५९ अॅप्सवर केंद्र सरकारने बंदी घालत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे चीनची डिजिटल प्लॅटफॉर्मवर कोंडी होणार हे नक्की. 

पुणे : भारतात ५९ प्रसिद्ध चायनीज अ‍ॅपवर बंदी घालण्याची घोषणा केंद्र सरकारने केलेली आहे. यात टिकटॉक पासून यूसी ब्राऊझर, हॅलो अ‍ॅप आणि शेअरइट यासारख्या प्रसिद्ध अ‍ॅपचा समावेश आहे. भारतात या अ‍ॅपचे कोट्यवधी युजर्स होते. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या यादीत पबजी मोबाईल आणि झूम अ‍ॅपचे नाव देखील नाही. तरी सुद्धा हे दोन्ही अ‍ॅप खूपच प्रमाणात वापरले जातात. बंदी घातलेली यादी पाहिल्यानंतर बरेच लोक विचारीत आहेत की, जर प्रसिद्ध अ‍ॅपवर बंदी घातली तर या दोन अ‍ॅपचा यात समावेश का नाही. कारण टिक टॉक वर भारताने कायमची बंदी घातलेली आहे. पण अजूनही पबजी गेम भारतात मोठ्या प्रमाणात वापरला जातो. 

पबजी हा चायनीज अ‍ॅप आहे का ?
पबजी एक जगप्रसिद्ध ऍक्शन  गेम अ‍ॅप आहे. तर हा अ‍ॅप दक्षिण कोरियाच्या  ''ब्लुहोल'' नामक  व्हिडिओ गेम कंपनीच्या सब्सिडियरी कंपनीने बनविला आहे. दोन हजार साली आलेल्या बॅटल रॉयल या जपानी चित्रपटामुळे हा ऍक्शन गेम अ‍ॅप बनविला आहे.   

या गेमचे कनेक्शन म्हणजे, याचे फाउंडर Eric Yuan आहे. ज्यांचा जन्म चीनमध्ये झाला होता. परंतु, ते अमेरिकन नागरिक आहेत. गेम कंपन्यांपैकी एक टॉन्सन्ट्स गेम्स  चीनची कंपनी आहे. टेंसेंट गेम्सने पबजीला चीनमध्ये लाँच करण्यासाठी एक ऑफर दिली होती. त्यासाठी काही भागीदारी खरेदी केली होती. पण  पबजी ला चीनमध्ये बंदी घातली आहे. चीनमध्ये याला नवीन नावाने लाँच करण्यात आले आहे. पबजीची ऑनरशीप संयुक्त आहे. परंतु, झूम कम्यूनिकेशन ही एक अमेरिकन कंपनी आहे.

भारत सरकारने जाहीर केलेल्या यादीमध्ये पबजी ऍक्शन गेम अ‍ॅप आहे की नाही याचा शोध प्रत्येक जण घेताना दिसत आहे. मात्र पबजीच्या चाहत्यांसाठी एक दिलासा देणारी अशी बाब म्हणजे भारत सरकारने बंदी घातलेल्या अ‍ॅपच्या यादीत पबजीचा समावेश नाही आहे . त्यामुळे अद्याप तरी आपल्या भारत देशात  पबजी हा उपलब्ध आहे. त्यामुळे अजून काही काळ तरी भारतीय गेम चाहत्यांना  पबजीचा आनंद मनसोक्त घेता येणार आहे. 

हेही वाचा : वर्क फ्रॉम होम करताना अचानक कीबोर्ड खराब झाला तर ?

कोणत्या अ‍ॅपवर सरकारने बंदी घातली आणि का ?
सरकारने ज्या अ‍ॅपवर बंदी घातली आहे. त्यांचे कारण चीनचे हे अ‍ॅप भारतीय लोकांचा महत्वाचा डेटा हॅक करु शकतात, असा इशारा देऊन त्यांवर सरकारने बंदी घातली आहे. यामधे  टिकटॉक, शेअर इट , युसि ब्राउजर, लायकी , एमआय  कम्युनिटी, क्लब फॅक्टरी , बायडू  मॅप, हॅलो , क्लॅश ऑफ किंग ,  युसि न्यूज, वि चॅट  , बायगो  लाइव, एमआय व्हिडिओ कॉल-शाओमी, विगो  व्हिडियो, क्लीन मास्टर , चिताह मोबाईल , क्लीन मास्टर, कॅम सक्यनार  सह ५९ अ‍ॅपचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Is Pubg Mobile Banned In India Government Bans 59 Chinese Apps Including Tiktok