भारतात पब्जी-टू होणार लॉंच? भारतीय संस्कृतीवर असणार नवी रचना !

पब्जी टू मध्ये भारतीय संस्कृतीवर आधारित नवा गेम लॉंच होणार
Pubji
PubjiCanva

सोलापूर : पब्जीवरील (Pubji) बंदीनंतर पब्जी कॉर्पोरेशनकडून पब्जी-टू या गेम्सची भारतीय उपकंपनी तयार केली जात आहे. एवढेच नव्हे, तर भारतीय संस्कृतीचे (Indian Culture) प्रतिनिधित्व करेल अशी रचना तयार केली जाईल. त्यामुळेच पब्जी कार्पोरेशनने हा गेम भारतात टिकावा यासाठी ही शक्कल लढवली आहे. तसेच पब्जी मोबाईल खेळाच्या पुनरागमनाबद्दल आता पालकांकडून टीका केली जात आहे. येत्या जून महिन्यात पब्जी कॉर्पोरेशन हा गेम लॉंच करणार आहे. पण केंद्राच्या (Central Government) परवानगीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Pubji Two will launch a new game based on Indian culture)

मागील काही वर्षात पब्जी या मोबाईल गेमने जनसामान्य पालकांच्या मनात अनेक भीतिदायक संभ्रम निर्माण केले होते. परंतु आता काही महिन्यांतच पब्जी पार्ट-टू भारतात लॉंच करण्याची तयारी पब्जी समूह करत आहे. डेटा संरक्षणाविषयीच्या चिंतेमुळे, भारत सरकारने सप्टेंबर 2020 मध्ये पब्जी या मोबाईल गेम्सवर भारतात बंदी घातली होती.

Pubji
बोंबील, कांद्यामध्ये लपवून पुण्याला चालला कर्नाटकचा गुटखा ! सांगोला पोलिसांनी पकडलाच

पब्जी मोबाईल लाइटचा सीझन समाप्त झाला आहे. युद्धाची मनोरंजनात्मक पार्श्वभूमी असलेल्या या खेळात अनेक युवक विशेषतः 8 ते 30 वर्षे वयोगटातील मुले व तरुण जास्तच रमत गेली. पब्जी गेममधील आक्रमक आभासी जग हे सत्यात उतरवता येईल का? या विचाराने काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील घडले आहेत.

पब्जी कॉर्पोरेशनने यापूर्वीच एक भारतीय सहाय्यक कंपनी तयार केली आहे. स्थानिक गेमिंग, एस्पोर्टस्‌, करमणूक आणि आयटी उद्योगांना चालना देण्यासाठी कंपनीने भारतात 100 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. गेम डेव्हलपर्स एप्रिलमध्ये ट्रेलर रिलीज करण्याची योजना केली आहे आणि मे महिन्यात हा खेळ रिलीज होण्याची शक्‍यता आहे. तरी केंद्र शासनाकडून बॅन असणाऱ्या पब्जी गेमला परवानगी मिळेल का नाही, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Pubji
नॅशनल हेल्थ मिशनमध्ये सरकारी नोकरीची संधी ! विविध पदांच्या भरतीसंदर्भात जाणून घ्या सविस्तर

मुख्य करून मुलांनी मैदानी खेळाला जास्त वेळ दिला पाहिजे. परंतु सध्याच्या काळात घरी बसलेले असाल तरी पालकांनी आपला पाल्याला मोबाईल गेम्स खेळण्यासाठी किती वेळ दिला पाहिजे हे ठरवले पाहिजे. तसेच पब्जी या गेममुळे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर ई-गेमिंग स्किलमध्ये एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. परंतु याचा जितका चांगला परिणाम आहे तितकाच वाईट परिणाम देखील आहे.

- श्रीरंग सराफ, टेक्‍निकल एक्‍स्पर्ट

आपणाला खरंच गेमिंग क्षेत्राची जर आवड असेल तर भविष्यातील एक चांगला गेमिंग डेव्हलपर, गेमिंग टेस्टर म्हणून पब्जी या गेमकडे पाहिले पाहिजे. बाकी या गेम्स संदर्भातील मर्यादा आपण स्वतःला घातल्या पाहिजेत.

- मंदार करंडे, टेक्‍निकल एक्‍स्पर्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com