esakal | नॅशनल हेल्थ मिशनमध्ये सरकारी नोकरीची संधी ! विविध पदांच्या भरतीसंदर्भात जाणून घ्या सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

NHM

नॅशनल हेल्थ मिशनमध्ये सरकारी नोकरीची संधी ! विविध पदांच्या भरतीसंदर्भात जाणून घ्या सविस्तर

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानात (National Health Mission) सरकारी नोकरीची संधी (Government Job Opportunity) मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरीतील 166 पदांच्या भरतीसाठी जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक उमेदवार ज्यांनी अद्याप अर्ज केलेले नाही ते रत्नागिरी प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या अर्जाद्वारे अर्ज करू शकतात. एनएचएम रत्नागिरी भरती 2021 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मे 2021 निश्‍चित करण्यात आली आहे. (Government job opportunities in the National Health Mission)

असा करा अर्ज

अर्जासाठी उमेदवारांना रत्नागिरी प्रशासनाच्या https://ratnagiri.gov.in/notice_category/recruitment/ संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर भरती विभागात भेट द्यावी लागेल. यानंतर "रिक्रुटमेंट फॉर कोव्हिड-19' बरोबर दिलेल्या लिंकवर क्‍लिक करा. यानंतर संबंधित भरतीची जाहिरात खुली होईल. उमेदवार खाली दिलेल्या थेट लिंकवरून भरतीची जाहिरात डाउनलोड करू शकतात. अर्ज भरती जाहिरातीतच देण्यात आला आहे. संपूर्ण कागदपत्रे आणि आवश्‍यक कागदपत्रांसह जाहिरातींमध्ये दिलेल्या ई- मेल आयडीवर पाठवून आपण हा फॉर्म संपूर्णपणे पाठवू शकता.

हेही वाचा: IGNOU : जुलै सेशनसाठी करा 15 जूनपर्यंत पुन्हा नोंदणी ! 'जून टर्मएंड'संबंधी जाणून घ्या सविस्तर

रिक्त पदांची संख्या आणि पदांनुसार पात्रता

  • फिजिशियन (6 पदे) एमडी मेडिसीन

  • ऍनेस्थिसियोलॉजिस्ट (15 पदे) एमडी, डीए आणि डीएनबी

  • मायक्रोबॉयोलॉजिस्ट (2 पदे) मायक्रोबॉयोलॉजी मध्ये एमडी

  • मेडिकल ऑफिसर (15 पदे) एमबीबीएस डिग्री

  • आयुष मेडिकल ऑफिसर (12 पदे) बीएएमएस किंवा बीयूएमएस किंवा बीडीएस

  • स्टाफ नर्स (100 पदे) बीएस्सी नर्सिंग

  • लॅबोरेटरी टेक्‍निशिअन (16 पदे) बीएस्सी डीएमएलटी