2900 च्या EMI वर इलेक्ट्रिक स्कूटर; एका चार्जमध्ये धावेल 120 किमी

PureEV EPluto 7G
PureEV EPluto 7G

देशात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी सातत्याने वाढत आहे. यासोबतच बाजारपेठेत इलेक्ट्रिक गाड्यांचे पर्यायही वाढत आहेत. अलीकडे, हैदराबाद- बेस्ड स्टार्टअप कंपनी PureEV ने त्यांची पावरफुल इलेक्ट्रिक स्कूटर PureEV EPluto 7G सादर केले आहे. या स्कुटरची खास गोष्ट म्हणजे या स्कूटरमध्ये तुम्हाला 120 किमी पर्यंतची रेंज मिळेल म्हणजे एकदा चार्ज केल्यास हे स्कूटर 120 किमी चालेल आणि तुम्ही ही स्कूटर EMI वर 2900 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.

EPluto 7G ही कंपनीची सर्वात प्रीमियम स्कूटर असून ही 5 सेकंदात 40 किमी प्रति तासाचा वेग गाठते. यात 1.5KW मोटर आणि 2.5kWh लिथियम-आयन बॅटरी आहे. जी पूर्ण चार्ज केल्यावर ते 90 ते 120 किमीची रेंज देते. या स्कूटरचा टॉप स्पीड 60KMPH आहे. 0 ते 40kmph चा वेग पकडण्यासाठी फक्त 5 सेकंद लागतात असा कंपनीचा दावा आहे. तसेच ही पूर्ण चार्ज होण्यासाठी 5 ते 6 तास लागतात.

PureEV EPluto 7G
PM मोदींचे ट्विटर अकाउंट हॅक! तुमचं अकाउंट कसं ठेवाल सुरक्षित?

असे आहेत फीचर्स

या इलेक्ट्रिक स्कूटरचे डिझाईन व्हेस्पा आणि बजाज चेतक इलेक्ट्रिक सारखीच असेल. यात क्रोम-फिनिश्ड मिररसह गोल हेडलॅम्प्स मिळतात. यात 5 इंचाचा एलसीडी डिस्प्ले, एलईडी हेडलॅम्प, अँटी थेफ्ट सिस्टमसह स्मार्ट लॉक दिलेले आहे. स्कूटरचे कर्ब वजन सुमारे 76 किलो आहे. यात 10-इंच अलॉय व्हीलसह ब्रेकिंगसाठी डिस्क-ड्रम ब्रेक मिळतील.

PureEV EPluto 7G
येतोय 1TB स्टोरेज असलेला पहिला स्मार्टफोन; जाणून घ्या अपेक्षित किंमत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com