Raksha Bandhan 2021 : बहिणीला गिफ्ट करा 'हा' 5G स्मार्टफोन, किंमतही आहे बजेटमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

5G Smartphones

बहिणीला गिफ्ट करा 'हे' 5G स्मार्टफोन, किंमतही आहे बजेटमध्ये

Raksha Bandhan 2021 : रक्षा बंधनाचा सण जवळ आला आला असल्याने सध्या बाजारात लगबग दिसून येत आहे. या दरम्यान जर तुम्ही तुमच्या लहान किंवा मोठ्या बहिणीला काही खास गीफ्ट देण्याचा विचार करत असाल तर, तुमच्यासाठी एक चांगली संधी सध्या उपलब्ध आहे. तुम्ही बहिणीला भेट म्हणून 5G स्मार्टफोन (5G Smartphone) देऊ शकता. सध्या 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात अत्यंत कमी किंमतीत उपलब्ध आहेत. आज आपण त्यापैकी काही निवडक 5G सपोर्टिंग स्मार्टफोन्सबद्दल माहिती घेणार आहोत, ज्यांची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी आहे. चला या परवडणाऱ्या 5G स्मार्टफोनवर एक नजर टाकूयात

Realme Narzo 30 5G

Realme Narzo 30 5G स्मार्टफोनच्या 64GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 13,999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि MediaTek Dimensity 700 प्रोसेसर देण्यात आलेले आहे. या डिव्हाइस 48MP + 2MP + 2MP कॅमेरा सेटअपसह दिला गेला असून. त्याच्या फ्रंटमध्ये 16 एमपीचा सेल्फी कॅमेरा मिळेल. याशिवाय फोनमध्ये 6.5 चा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे.

POCO M3 Pro 5G

POCO M3 Pro 5G स्मार्टफोनचा 64GB स्टोरेज वेरियंट फक्त 13,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोन मध्ये Dimensity 700 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबत फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. यामध्ये 2MP डेप्थ लेन्स आहे ज्यात 48MP प्रायमरी सेन्सर आणि तिसरा 2MP मॅक्रो सेन्सर देण्यात आलेला आहे. तर या फोनच्या फ्रंटमध्ये 8MPचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय हा स्मार्टफोन 6.5 इंचाचा एलसीडी डिस्प्ले आणि 5000 एमएएच बॅटरीने सुसज्ज आहे.

हेही वाचा: Airtel, Jio ची ग्राहकांसाठी खास 'ऑफर'

Oppo A53s 5G

Oppo A53s 5G स्मार्टफोनचा 64GB स्टोरेज व्हेरियंट हा फक्त 15,990 रुपयांमध्ये तुम्ही खरेदी करु शकता शकतो. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 700 प्रोसेसर, 5,000mAh बॅटरी आणि 6.52-इंच HD प्लस डिस्प्ले या फोनमघ्ये देणात आला आहे. यासोबत फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. यातील पहिला 13MP मुख्य कॅमेरा, दुसरा 2MP डेप्थ सेन्सर आणि तिसरा 2MP मॅक्रो लेन्स आहे. याशिवाय फोनच्या समोर 8 MP कॅमेरा उपलब्ध असेल.

Redmi Note 10T 5G

Redmi Note 10T 5G स्मार्टफोनचे 64GB स्टोरेज वेरियंट 16,470 रुपये किंमतीला खरेदी करता येईल. हा स्मार्टफोन 6.5 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आणि MediaTek Dimensity 700 प्रोसेसरने सुसज्ज आहे. याशिवाय स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून त्याचा प्रायमरी सेन्सर 48MP आहे. त्यात 2MP मॅक्रो लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. याव्यतिरिक्त, यात व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 8 MP कॅमेरा मिळेल. त्याच वेळी, हे डिव्हाइस MIUI 12 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे जे Android 11 वर काम करते.

हेही वाचा: स्मार्टफोन वापरुन छान फोटो काढायचेत? 'या' टिप्स ठरतील उपयोगी

Web Title: Raksha Bandhan 2021 Gift Your Sister These 5g Smartphones Under 15000 Rupees

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Technology