World Photography Day : स्मार्टफोनमध्ये छान फोटो काढायचेत? वापरा 'या' टिप्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

smartphone photography

स्मार्टफोन वापरुन छान फोटो काढायचेत? 'या' टिप्स ठरतील उपयोगी

बरेच लोक फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनचा वापर करतात. काही टिप्स फॉलो करून तुम्ही देखील स्मार्टफोनवरूनही चांगली फोटोग्राफी करु शकता.आज आपण अशाच काही टिप्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या वापरुन तुम्ही स्मार्टफोनवरून फोटो काढण्याचे स्किल्स सुधारू शकता. 

नैसर्गिक प्रकाशाचा वापर 

आपल्या स्मार्टफोनवरून फोटो घत असताना नेहमी नैसर्गिक प्रकाश वापरण्याचा प्रयत्न करा. फ्लॅश वापरल्याने स्मार्टफोनवरुन फार चांगले फोटो काढता येत नाहीत. यामुळे, जर तुम्ही अंधारातही फोटो काढत असाल, तर शॅडोसोबतच फोटो काढण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटो काढताना फोकस आणि एक्सपोजर कंट्रोल करता येते. हे एक्सपोजर वापरून तुम्ही लाईट वाढवू शकता.

झूम करणे टाळा

जर फोटो घेत असलेली वस्तू तुमच्यापासून दूर असेल तर फोनचा कॅमेरा झूम करण्याऐवजी तुम्ही त्या वस्तूकडे जा. या व्यतिरिक्त तुम्ही डीफॉल्ट अंतरावरून फोटो काढून नंतर तो क्रॉप करू शकता. यामुळे तुमच्या फोटोची क्वालिटी टिकून राहील आणि तुम्ही चांगले फोटो काढू शकाल. 

हेही वाचा: ऑनलाईन व्यवहार करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, होणार नाही फसवणूक

HDR मोड वापरा

एचडीआर किंवा हाय डायनॅमिक रेंज आता बहुतेक स्मार्टफोनमध्ये दिली जाते. हे फोटोच्या सर्वात गडद भागात आणि सर्वात हलके भागात डिटेल्स कलर बॅलेन्स करते . मात्र यामुळे तुम्हा काढलेल्या फोटोवर प्रोसेस होण्यास थोडा वेळ लागतो. 

फोटो क्लिक करताना फोन स्थिर ठेवा

फोटो क्लिक करताना फोन थोडा जरी हलला तर फोटो खराब होऊ शकतो. यासाठी फोटो क्लिक करताना फोन स्थिर ठेवणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही छोटा ट्रायपॉड वपरु शकता किंवा फोटोग्राफी दरम्यान स्वतःला बऱ्यापैकी स्थिर ठेवून हात स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा.

थर्ड पार्टी कॅमेरा अॅप

आता प्ले स्टोअरमध्ये तुम्हाला अनेक थर्ड पार्टी कॅमेरा अॅप्स देखील मिळतील. त्यांच्या मदतीने तुम्ही नवीन ऑप्शन्स एक्सप्लोर करू शकता जे तुमचे फोटोग्राफी आणखी चांगली करू शकतात. हे वापरुन तुम्ही शक्य असल्यास तुमचे फोटो थोडे एडीट देखील करू शकता.

हेही वाचा: होंडाची सर्वात स्वस्त कार Honda Amaze भारतात लॉंच; जाणून घ्या किंमत