New Smartphone Launch : एकच झलक, सबसे अलग! लाँच झाला Realme 14x 5G; जबरदस्त फीचर्स अन् सुपर कॅमेरा, बजेटमधला फोन बघाच

Realme 14x 5G smartphone price features : Realme कंपनीने भारतात आपला Realme 14x हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा Realme 14 सीरिजमधील पहिला स्मार्टफोन आहे.
Realme 14x 5G smartphone price
Realme 14x launched in india mobile price featuresesakal
Updated on

Realme 14x 5G Mobile : स्मार्टफोन क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासाठी ओळखल्या जाणाऱ्या Realme कंपनीने भारतात आपला Realme 14x हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा Realme 14 सीरिजमधील पहिला स्मार्टफोन असून, यापूर्वी एप्रिल 2023 मध्ये लॉन्च झालेल्या Realme 12x चा हा अपग्रेडेड व्हर्जन आहे.

मुख्य फीचर्स

Realme 14x मध्ये अनेक दमदार फीचर्स दिले गेले आहेत, ज्यामुळे हा स्मार्टफोन आपल्या किंमतीत उत्तम पर्याय ठरणार आहे.

MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरसह गती आणि परफॉर्मन्ससाठी अत्याधुनिक चिपसेट.

6,000mAh बॅटरीसह 45W फास्ट चार्जिंगसह जास्त काळ टिकणारी बॅटरी.

Rainwater Smart Touch आणि SonicWave Water Ejection जे पावसाळी हवामानातही सहज वापरता येण्याचे अत्याधुनिक फिचर्स.

IP68 आणि IP69 रेटिंग धूळ आणि पाण्यापासून उत्कृष्ट संरक्षण देते.

Realme 14x 5G smartphone price
Oneplus 13 Launch : नव्या वर्षाची धमाकेदार सुरुवात; या तारखेला लाँच होतोय Oneplus 13, जबरदस्त फीचर्स अन् किंमत फक्त...

किंमत आणि उपलब्धता

Realme 14x ची सुरुवातीची किंमत फक्त 14,999 रुपये आहे (6GB + 128GB व्हेरिएंट). 8GB + 128GB व्हेरिएंट 15,999 रुपायांमध्ये उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन Flipkart, Realme च्या अधिकृत ई-स्टोअर आणि ऑफलाइन रिटेल स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

या मोबाईल तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. Crystal Black, Golden Glow, आणि Jewel Red.

डिस्प्ले आणि परफॉर्मन्स

Realme 14x मध्ये 6.67 इंचाचा HD+ IPS LCD डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटसह येतो. यामुळे गतीशील स्क्रीन अनुभव मिळतो. डिस्प्लेची कमाल ब्राइटनेस क्षमता 625 निट्स आहे, जी प्रकाशमान वातावरणातही उत्तम कामगिरी करते.

Realme 14x 5G smartphone price
Aadhaar Card Update : आधार कार्ड अपडेटसाठी 'ही' आहे शेवटची तारीख, आत्ताच करून घ्या महत्वाचे बदल

कॅमेरा आणि ऑडिओ फिचर्स

ड्युअल रिअर कॅमेरा 50MP चा प्रायमरी कॅमेरा व एक सेकंडरी सेन्सर.

सेल्फीसाठी 8MP कॅमेरा दर्जेदार व्हिडिओ कॉलिंगसाठी.

Hi-Res ऑडिओ सपोर्ट प्रीमियम साउंड अनुभवासाठी.

कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षा आहे. 5G सपोर्ट नवीनतम नेटवर्कसाठी सुसज्ज, साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, ब्लूटूथ 5.3 आणि GPS आधुनिक कनेक्टिव्हिटीसाठी, USB Type-C पोर्ट जलद डेटा ट्रान्सफर आणि चार्जिंगसाठी.

Realme 14x का खरेदी करावा?

Realme 14x हा स्मार्टफोन दमदार परफॉर्मन्स, उत्कृष्ट टिकाऊपणा, आणि किफायतशीर किंमतीच्या समीकरणाने वापरकर्त्यांसाठी सर्वोत्तम पर्याय ठरतो. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर Realme 14x हा तुमच्यासाठी नक्कीच एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

फक्त 14,999 च्या आकर्षक किंमतीत मिळणारा हा स्मार्टफोन तंत्रज्ञानप्रेमींसाठी मोठी भेट ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com