

Hogwarts 5G Phone: जगातील लोकप्रिय 'हॅरी पॉटर' (Harry Potter) फ्रँचायझीच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी 'रीअलमी' (realme) उद्या म्हणजेच 21 सप्टेंबरला आपला नवा realme 16 Pro Harry Potter Edition भारतभरात लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन वॉर्नर ब्रॉस (Warner Bros) सोबतच्या विशेष भागिदारीतून तयार करण्यात आला आहे. गेल्या वर्षी कंपनीने लाँच केलेल्या realme 15 Pro Game of Thrones Limited Edition नंतरचा हा दुसरा मोठा फ्रँचायझी-बेस्ड स्मार्टफोन ठरणार आहे.