realme 9i 5g smartphone launch in india on 18 august check price and  specifications here
realme 9i 5g smartphone launch in india on 18 august check price and specifications here

लवकरच येतोय रिअलमीचा स्वस्तात मस्त 5G फोन; जाणून घ्या डिटेल्स

5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा प्लॅन असेल, तर आणखी काही दिवस थांबा. कारण 18 ऑगस्ट रोजी भारतात एक नवीन 5G फोन लॉन्च होणार आहे. नुकतेच Realme ने घोषणा केली की ते 18 ऑगस्ट रोजी Realme 9i 5G भारतात लॉन्च करण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही 5G फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा तुमच्यासाठी एक पर्याय असू शकतो.

कंपनी हा MediaTek Dimensity 810 5G चिपसेटसह एंट्री-लेव्हल फोन म्हणून लॉन्च करेल. हा फोन Realme 9i ची 5G आवृत्ती आहे, जो या वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च करण्यात आला होता. लॉन्चची घोषणा करण्याव्यतिरिक्त, कंपनीने Realme 9i 5G ची प्रमुख फीचर्स देखील शेअर केले आहेत.

भारतातील Realme 9 सीरीजमध्ये आधीच Realme 9, Realme 9 5G, Realme 9 5G स्पीड एडिशन, Realme 9 Pro 5G, Realme 9 Pro+ 5G आणि Realme 9i 4G फोन सादर केले आहेत.

realme 9i 5g smartphone launch in india on 18 august check price and  specifications here
Royal Enfield ने भारतात लाँच केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत

Realme 9i 5G फोनमध्ये काय खास असेल?

Realme ने म्हटले आहे की 9i 5G मीडियाटेक डायमेंसिटी 810 5G चिपसेटद्वारे समर्थित असेल, जे एंट्री-लेव्हल 5G फोनसाठी स्टँडर्स आहे. कंपनीने याआधीही Dimensity 810 चिपसेट वापरला आहे. कंपनीने सांगितले की Realme 9i 5G नवे डिझाइन, मोठी बॅटरी आणि AI ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येईल.

91Mobiles च्या रिपोर्टनुसार, फोन ब्लू, गोल्डन आणि ब्लॅक या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो. तसेच तुम्हाला तीन स्टोरेज ऑप्शन्स देखील असतील ज्यामध्ये 4GB RAM / 64GB स्टोरेज, 4GB RAM / 128GB स्टोरेज आणि 6GB RAM / 128GB स्टोरेज मिळेल. आगामी Realme 5G हँडसेट 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा 5G स्मार्टफोन असू शकतो, याबद्दल कंपनीच्या सीईओने या आधी सांगितले होते.

realme 9i 5g smartphone launch in india on 18 august check price and  specifications here
OnePlus चा सर्वात स्वस्त फोन लॉन्च, किंमत १६ हजारांहून कमी

Realme 9i 5G चे बाकीचे स्पेसिफिकेशन्स अजून समोर आलेले नाहीत. दरम्यान शक्यता आहे की Realme येत्या काही दिवसात फोनबद्दल एक किंवा दोन फीचर शेअर करेल. जोपर्यंत 4G व्हर्जनमध्ये ज्याला Realme 9i म्हणतात, फीचरमध्ये Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर दिले आहे. Realme 9i 90Hz रिफ्रेश रेटसह 6.6-इंच फुलएचडी एलसीडीसह येतो.यात 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज आहे.तुम्ही समर्पित मायक्रोएसडी कार्ड स्लॉटद्वारे Realme 9i चे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवू शकता. फोनच्या मागील बाजूस तीन कॅमेरे, ज्यात PDAF सह 50-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा, 2-मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल मोनोक्रोम कॅमेरा मिळतो.

Realme 9i 5G लॉन्च कधी होईल?

Realme 9i 5G लॉन्च इव्हेंट 18 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता सुरू होईल. कंपनीने म्हटले आहे की ती आपल्या चॅनेलद्वारे यूट्यूब, फेसबुक आणि ट्विटरवर इव्हेंट लाईव्ह-स्ट्रीम करेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com