Realme Festival Sale : स्मार्टफोनवर मिळतायेत दमदार ऑफर, कमी किमतीत करा खरेदी


realme golden festival sale on christmas buy phones for less than eight thousand
realme golden festival sale on christmas buy phones for less than eight thousand

स्मार्टफोन ब्रँड Realme आपल्या ग्राहकांसाठी एक ख्रिसमस भेट घेऊन आला आहे. Realme ने 20 डिसेंबरपासून Realme Golden Festival Sale सुरू केला आहे. या सेलमध्ये Realme च्या स्मार्टफोन्स आणि इतर डिव्हाइसेसवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. रिअलमीच्या या सेलमध्ये ग्राहक Amazon India आणि Flipkart या दोन्हींवरून ऑफर अंतर्गत स्मार्टफोन खरेदी करू शकतात. या सेलमध्ये, Realme C30 आणि Realme 9 सीरीजवर 4500 रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे.

Realme C30 वर ऑफर

नुकताच लॉन्च झालेला हा फोन सेल अंतर्गत फक्त 5,749 रुपयांना खरेदी करता येईल. फोनमध्ये 6.5-इंच फुलएचडी डिस्प्लेसह Unisoc T612 प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये 8MP प्रायमरी कॅमेरा आणि 5MP सेल्फी कॅमेरा आहे. फोनसोबत 5,000mAh बॅटरी आणि 32GB स्टोरेज उपलब्ध आहे.


realme golden festival sale on christmas buy phones for less than eight thousand
Vasant More News : राज ठाकरेंच्या बेशिस्त नेत्यांना इशाऱ्यांनंतर वसंत मोरे बोलले; म्हणाले…

Realme 9 सीरीजवर ऑफर

सेल दरम्यान, Realme 9 चा 6 GB रॅम सह 128 GB स्टोरेज व्हेरिएंट 14,999 रुपयांना खरेदी करता येईल. त्याच वेळी, Realme 9 5G SE हा 17,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. या फोनमध्ये 6 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज देखील उपलब्ध आहे.

Realme 9 5G SE ला Android 11 आधारित Realme UI 2.0 मिळतो. फोनमध्ये 6.6-इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी 16-मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध आहे. यासोबत 5000mAh बॅटरी आणि 18W क्विक चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.


realme golden festival sale on christmas buy phones for less than eight thousand
Raj Thackeray : "...तर हकालपट्टी अटळ आहे", राज ठाकरेंचा वसंत मोरेंना इशारा?

'या' स्मार्टफोन्सवर ऑफर्स

Realme ने नुकतीच लॉन्च केलेली Realme 10 Pro सीरीज सेल दरम्यान कमी किंमतीत खरेदी करता येईल. त्याच वेळी, Realme C33 च्या 3 GB RAM सह 32 GB स्टोरेज व्हेरिएंट 8,999 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. Realme Narjo 50i Prime आणि Realme Narjo 50i देखील 8 हजारांपेक्षा कमी किमतीत विकत घेता येतील.


realme golden festival sale on christmas buy phones for less than eight thousand
200MP कॅमेरा असलेला खिशाला परवडणारा फोन भारतात लॉंच; फक्त12 मिनिटांत होतो फूल चार्ज

या उपकरणांवरही मोठी सूट

सेल दरम्यान Realme Pad mini हा 8,999 रुपयांना आणि Realme Pad Slim हा 11,999 रुपयांना खरेदी करता येईल. Realme Book Slim Core i5 वर 12,000 रुपयांपर्यंत आणि Core i3 व्हिरिएंटवर 9,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. Realme Book Slim Core i3 हा 37,999 रुपयांना खरेदी करता येईल. Realme चा लॅपटॉप Core i5 व्हेरिएंट 47,999 रुपयांना उपलब्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com