24 सप्टेंबरला लॉन्च होणार Realme Narzo 50, काय असतील फीचर्स? पाहा

Realme Narzo 50
Realme Narzo 50Sakal

Realme कंपनीने 24 सप्टेंबर रोजी भारतीय बाजारात Realme Narzo 50 सीरीज लाँच करण्यात येणार असल्याची घोषणा केला आहे. एवढेच नाही तर Realme Narzo 50, Realme Band 2 आणि Smart TV Neo 32-inch देखील बाजारात दाखल होणार आहेत. हा कार्यक्रम 24 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता आयोजित केला जाईल. हे डिव्हाईस ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर लीस्ट करण्यात आले आहेत आणि या सीरीजच्या काही फीचर्सबद्दल खुलासा देखील करण्यात आला आहे. चला तर मग पाहूया काय असतील हे फीचर्स

Realme Narzo 50 चे फीचर्स

Flipkart वर Realme Narzo 50 च्या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर दिले जाईल आणि ग्राफिक्स साठी ARM Mali G52 GPU दिले जाईल. तसेच या स्मार्टफोनमध्ये पावर बॅकअपसाठी 6,000mAh ची बॅटरी मिळेल. कंपनीचा दावा आहे की ती एकाच वेळी 53 तास स्टँडबाय टाइम, 48 तास कॉलिंग वेळ, 111 तास स्पॉटिफाई, 26 तास व्हॉट्सअॅप आणि 8 तास गेमिंग चालू शकेल. या फोनमध्ये 'सुपर पॉवर सेव्हिंग मोड' देखील दिला जाईल. कंपनीने 24 सप्टेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात Realme Narzo 50 सोबत Narzo 50A आणि Narzo 50i लाँच केले जाईल की नाही याबद्दल माहिती देण्यात आलेला नाही.

Realme Narzo 50
स्वस्तात दमदार फीचर्स, Infinix Hot 11 आणि Infinix Hot 11s लॉंच

Realme Band 2 चे फीचर्स काय असतील?

Realme Band 2 बद्दल उघड झालेल्या माहितीनुसार, या फोनमध्ये एक मोठा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसेच वापरकर्त्यांना स्पोर्ट्स मोड आणि हेल्थ मॉनिटर्स दिले जाऊ शकते. हे डिव्हाईस भारतापूर्वी मलेशियात लाँच करण्यात आले आहेत. यात 1.4 इंचाचा टच डिस्प्ले आहे. यामध्ये 50 पर्सनलाइज्ड डायल फेस आणि हार्ट रेट मॉनिटर सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Realme Narzo 50
Realme चा सर्वात स्वस्त 50 मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोन लॉंच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com