
Realme Neo 7 Turbo AI Smartphone Launch price features
esakal
रियलमीने नवीन स्मार्टफोन लॉंच केला आहे
हा मोबाईल मिडरेंजमध्ये उपलब्ध झाला आहे
चला तर मग जाणून घेऊया याबद्दल सर्वकाही
Realme Neo 7 Turbo AI Launch : रियलमीने नवीन गेमिंग फोन Realme Neo 7 Turbo AI लाँच करत मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री केली आहे. हा फोन 7200mAh च्या शक्तिशाली बॅटरीसह येतो जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. गेमिंग आणि हायपरफॉर्मन्सच्या चाहत्यांसाठी हा फोन एक उत्तम पर्याय ठरणार आहे. सध्या हा मर्यादित AI एडिशन फोन चीनच्या मार्केटमध्ये चायना मोबाईलच्या सहकार्याने सादर करण्यात आला आहे ज्यामध्ये कस्टमाइझ्ड मँगो कार्ड क्लब इंटरफेस आणि प्रीलोडेड अॅप्स उपलब्ध आहेत.