
Redmi A1 : रेडमीचा एंट्री लेव्हल स्मार्टफोन भारतात लॉंच, जाणून घ्या डिटेल्स
Redmi 11 Prime आणि Redmi 11 Prime 5G सोबत, Xiaomi ने Redmi A1 देखील भारतात लॉन्च केला आहे. कंपनीच्या नवीन Redmi A सीरीजचा हा पहिला एंट्री-लेव्हल स्मार्टफोन आहे. Redmi A1 त्यांच्यासाठी आहे ज्यांना फीचर फोनवरून Android स्मार्टफोनवर स्विच करायचे आहे. हा फोन HD+ डिस्प्ले आणि मोठ्या बॅटरीसह येतो. Redmi च्या या फोममध्ये मागे ड्युअल कॅमेरा सेटअप देखील आहे. भारतातील Redmi A1 ची किंमत, सूट, वैशिष्ट्ये आणि विक्रीची तारीख जाणून घेऊयात
Redmi A1 भारतात किंमत
Redmi A1 हा फोन सिंगल स्टोरेज पर्यायासह लॉन्च करण्यात आला आहे. या फोनमध्ये 2GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेजसह Redmi A1 ची किंमत 6,499 रुपये आहे. हा फोन तीन रंगांमध्ये येतो - काळा, हिरवा आणि निळा. तुम्ही हा फोन पहिल्यांदा 9 सप्टेंबर रोजी Mi.com, Mi Home Stores, Amazon India वरून खरेदी करू शकाल.
Redmi A1 फीचर्स आणि स्पेसिफीकेशन्स
Redmi A1 प्रीमियम लेदर-टेक्श्चर डिझाइन देण्यात आले आहे. फोनमध्ये 6.52-इंचाचा HD+ डिस्प्ले आआणि वरच्या बाजूला एक स्पीकर आहे.फोनमध्ये FM रेडिओ अॅप देखील येते. Redmi A1 मध्ये 10W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 mAh बॅटरी मिळते. Redmi A1 मध्ये Mediatek Helio A22 चिपसेट दिला असून हा 2GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेजसह येतो आहे. Xiaomi ने असा दावा केला आहे की त्याने लॅग-फ्री एक्सपिरीएंससाठी 20+ सॉफ्टवेअर ऑप्टिमायझेशन केले आहे.
कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास Redmi A1 फोनमध्ये 8MP ड्युअल कॅमेरा सेटअप आणि 5MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा एचडी व्हिडिओ रेकॉर्ड करण्याच्या क्षमतेसह येतो. Redmi A1 मध्ये पोर्ट्रेट मोड देखील उपलब्ध आहे.