Redmi K50 Extreme Edition : 108 मेगापिक्सेल कॅमरासह 'या' दिवशी होणार लॉन्च

redmi k50 extreme edition with 108 megapixel rear camera launch date conferm
redmi k50 extreme edition with 108 megapixel rear camera launch date conferm

Redmi K50 Extreme Edition लाँचची तारीख कंन्फर्म आहे. Redmi K50 Extreme Edition चीनमध्ये 11 ऑगस्ट रोजी लॉन्च होईल. Xiaomi ने चीनी सोशल मीडिया साइट Weibo च्या माध्यमातून या लेटेस्ट फोनच्या लॉन्चची माहिती दिली आहे. Redmi K50 Extreme Edition चे डिझाईन आणि काही फीचर्स देखील लॉन्च होण्यापूर्वी समोर आले आहेत.

या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर मिळेल. याशिवाय Redmi च्या या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले उपलब्ध असेल. तसेच या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे उपलब्ध असतील ज्यात प्रायमरी लेन्स 108 मेगापिक्सेल असेल. तसेच Redmi K50 Extreme Edition पंचहोल डिस्प्ले डिझाइनसह येईल.

Redmi K50 Extreme Edition चे लॉन्चिंग चीनमध्ये 11 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4 वाजता होणार आहे. काही दिवसांपूर्वी, एका लीक झालेल्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की Redmiच्या या फोनला OLED डिस्प्ले सह सादर केले जाईल.

redmi k50 extreme edition with 108 megapixel rear camera launch date conferm
Jio Independence Offer 2022 : मिळतोय फ्री डेटा, डिस्ने+हॉटस्टार अन् बरंच

याशिवाय Redmi K50 Extreme Edition मध्ये 120W फास्ट चार्जिंग उपलब्ध असेल. फोनमधील 108 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा व्यतिरिक्त, दुसरी लेन्स 8 मेगापिक्सेल आणि तिसरी लेन्स 2 मेगापिक्सलची असेल. समोर 20-मेगापिक्सेल कॅमेरा मिळू शकतो.

कनेक्टिव्हिटीसाठी, Redmi K50 Extreme Edition ला ब्लूटूथ v5.2, NFC आणि Wi-Fi 6E सह 5G सपोर्ट मिळेल. या वर्षी मार्चमध्ये चीनमध्ये Redmi K50 Pro आणि Redmi K50 लाँच करण्यात आला होता. यापैकी एका फोनमध्ये डायमेंसिटी 9000 आणि दुसऱ्या फोनमध्ये डायमेंसिटी 8100 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनसोबत डॉल्बी व्हिजन डिस्प्ले देखील आहे.

redmi k50 extreme edition with 108 megapixel rear camera launch date conferm
Samsung Galaxy Unpacked 2022 : आज सॅमसंगचा मेगा इव्हेंट, लाईव्ह कुठे पाहाल?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com