Samsung Galaxy Unpacked 2022 : आज सॅमसंगचा मेगा इव्हेंट, लाईव्ह कुठे पाहाल?

samsung galaxy unpacked 2022 know how to watch event livestream and what to expect Galaxy Z Flip 4 Galaxy Z Fold 4
samsung galaxy unpacked 2022 know how to watch event livestream and what to expect Galaxy Z Flip 4 Galaxy Z Fold 4

सॅमसंगचा आज म्हणजेच 10 ऑगस्ट रोजी एक मेगा इव्हेंट होणार आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील या कार्यक्रमाचे नाव गॅलक्सी अनपॅक्ड (Samsung Galaxy Unpacked 2022) असे ठेवण्यात आले आहे. सॅमसंगच्या या इव्हेंटमध्ये Samsung Galaxy Z Fold 4 आणि Galaxy Z Flip 4 असे दोन मोठे फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. हे दोन्ही फोन फोल्डेबल असतील, जे Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 ची अपग्रेड केलेली आवृत्ती असेल. सॅमसंगचा इव्हेंट आज संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल, जो तुम्ही त्यांच्या सोशल मीडिया हँडल आणि सॅमसंगच्या वेबसाइट व्यतिरिक्त Samsung च्या YouTube चॅनेलवर पाहू शकता.

कोणते प्रॉडक्ट लॉन्च केली जातील अन् किंमत किती असेल?

लीक झालेल्या रिपोर्टनुसार Samsung Galaxy Z Fold 4 च्या 256 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,799 युरो म्हणजेच सुमारे 1,46,400 रुपये असेल. त्याच वेळी, 512 GB ची किंमत 1,919 युरो म्हणजेच सुमारे 1,56,200 रुपये असल्याचे सांगितले जात आहे. Galaxy Z Flip 4 च्या 128 GB व्हेरिएंटची किंमत 1,109 युरो म्हणजेच सुमारे 90,300 रुपये असू शकते. त्याच वेळी, या फोनच्या 256 जीबी मॉडेलची किंमत 1,169 युरो म्हणजेच जवळपास 95,100 रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

Samsung Galaxy Watch 5 (40mm) ची किंमत 299 युरो म्हणजेच सुमारे 24,300 रुपयांपासून सुरू होईल असे सांगितले जात आहे. त्याच वेळी, Galaxy Watch 5 Pro (45mm) ची किंमत 469 युरो म्हणजेच सुमारे 38,200 रुपयांपासून सुरू होईल. एका नवीन रिपोर्टनुसार म्हटले जात आहे की Samsung Galaxy Buds 2 Pro ची किंमत $230 म्हणजेच जवळपास 18,300 रुपये असू शकते.

samsung galaxy unpacked 2022 know how to watch event livestream and what to expect Galaxy Z Flip 4 Galaxy Z Fold 4
Jio Independence Offer 2022 : मिळतोय फ्री डेटा, डिस्ने+हॉटस्टार अन् बरंच

Samsung Galaxy Z Fold 4 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy Z Fold 4 बद्दल बोलायचे झाल्यासे या फोनला 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 7.6-इंचाचा डायनॅमिक AMOLED 2X इन्फिनिटी फ्लेक्स प्राइमरी डिस्प्ले मिळेल. दुसरा डिस्प्ले 6.2-इंचाचा डायनॅमिक AMOLED 2X इन्फिनिटी ओ कव्हर डिस्प्ले असेल. फोनमध्ये एलईडी फ्लॅश लाईटसह तीन रियर कॅमेरे असतील. या फोनमध्ये अंडर डिस्प्ले कॅमेरा देखील उपलब्ध असेल. फोनसोबत कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस + संरक्षण उपलब्ध असेल.

Samsung Galaxy Z Flip 4 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy Z Flip 4 मध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले असेल. Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह फोनला 8 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज मिळेल. Galaxy Z Flip 4 मध्ये 12-मेगापिक्सेलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल आणि तो चार रंगांमध्ये सादर केला जाईल.

samsung galaxy unpacked 2022 know how to watch event livestream and what to expect Galaxy Z Flip 4 Galaxy Z Fold 4
Royal Enfield Hunter 350 : किंमत कमी अन् फीचर्स दमदार, जाणून घ्या खासीयत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com