मस्तच! रेडमीचा लोकप्रिय स्मार्टफोन झाला खूपच स्वस्त, मिळतो ५०MP चा दमदार कॅमेरा | Redmi Smartphone | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Redmi Smartphone

Redmi Smartphone: मस्तच! रेडमीचा लोकप्रिय स्मार्टफोन झाला खूपच स्वस्त, मिळतो ५०MP चा दमदार कॅमेरा

Redmi Smartphone Price Cut: रेडमीने आपल्या लोकप्रिय स्मार्टफोन्सच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. कंपनीचा बजेट स्मार्टफोन Redmi Note 11 हा जवळपास १५०० रुपयांनी स्वस्त झाला आहे. परंतु, ही कपात कायमस्वरुपी आहे की ठराविक कालावधीसाठी हे कंपनीने अद्याप स्पष्ट केलेले नाही.

Redmi Note सीरिजला लाँच होऊन ८ वर्ष झाले आहेत. याच कारणामुळे कंपनीने आपल्या बजेट स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली असण्याची शक्यता आहे. Redmi Note 11 स्मार्टफोन तीन व्हेरिएंटमध्ये येतो. फोनच्या तिन्ही व्हेरिएंट्सच्या किंमतीत कपात झाली आहे. या फोनची सुरुवाती किंमत १२,९९९ रुपये आहे. फोनवर मिळणाऱ्या ऑफर्सविषयी जाणून घेऊया.

हेही वाचा - वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

Redmi Note 11 ची नवीन किंमत

Redmi Note 11 च्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १३,९९९ रुपये होती. परंतु, कपातीनंतर फक्त १२,९९९ रुपयात खरेदी करू शकता. फोनचे ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी व्हेरिएंट १३,४९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. याचे टॉप व्हेरिएंट ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसह येतो. याची किंमत १४,९९९ रुपये आहे. तुम्ही या सर्व फोन्सला कमी किंमतीत ई-कॉमर्स साइट Amazon आणि शाओमीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकता.

फ्लिपकार्टवर याचे बेस व्हेरिएंट १२,७९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास १००० रुपये डिस्काउंटचा फायदा मिळेल. म्हणजेच, शाओमीच्या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही फोनला ११,९९९ रुपये किंमती खरेदी करू शकता.

Redmi Note 11 चे स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 11 4G मध्ये ६.४३ इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६८० प्रोसेसरसह येतो. यात ६ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबीपर्यंत स्टोरेज दिले आहे. यात ५० मेगापिक्सलचा मुख्य क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनच्या फ्रंटला १३ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. तर पॉवर बॅकअपसाठी ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. फोन आयपी५३ रेटिंगसह येतो. मात्र, लक्षात ठेवा की फोनमध्ये ५जी सपोर्ट मिळत नाही.