रेडमीचे Note 11T Pro आणि 11T Pro+ लाँच; जाणून घ्या किंमत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

redmi note 11t pro and redmi note 11t pro plus launched check price and  specifications

रेडमीचे Note 11T Pro आणि 11T Pro+ लाँच; जाणून घ्या किंमत

Redmi Note 11T Pro Series : Xiaomi ने Redmi Note 11T Pro सिरीज लाँच केली आहे. कंपनीने या सीरीजचे दोन फोन सादर केले आहेत, ज्यात Redmi Note 11T Pro+ आणि Redmi Note 11T यांचा समावेश आहे. कंपनी Note 11T Pro + मध्ये तुम्हाला 120W चार्जिंग आणि 512GB पर्यंत स्टोरेज ऑफर केले जात आहे. Note 11T Pro मध्ये 67W चार्जिंग उपलब्ध आहे.

किंमत किती आहे?

किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Note 11T Pro ची किंमत CNY 1799 (सुमारे 21,000 रुपये) आहे आणि Note 11T Pro + ची किंमत CNY 2099 (सुमारे 24,500 रुपये) ठेवण्यात आली आहे.

Redmi Note 11T Pro तीन कॉन्फिगरेशनमध्ये येतो – 6GB/128GB, 8GB/128GB, आणि 8GB/256GB. त्याच्या 6GB/128GB ची किंमत CNY 1799 (अंदाजे रु. 21,000), 8GB/128GB ची किंमत CNY 1999 (अंदाजे रु 23,300), आणि 8GB/256GB ची किंमत CNY 2199 (अंदाजे रु. 560,500) आहे.

दुसरीकडे, Note 11T Pro+ हा फोन 8GB/128GB, 8GB/256GB आणि 8GB/512GB तीन कॉन्फिगरेशनमध्ये येतो. त्याच्या 8GB/128GB ची व्हेरिएंटची किंमत CNY 2099 (अंदाजे रु. 24,500), 8GB/256GB ची किंमत CNY 2299 (अंदाजे रु. 26,800), आणि 8GB/512GBव्हेरिएंटच ची किंमत CNY 2499 (अंदाजे रु. 2900) आहे.

हेही वाचा: पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे पूर्वीचं बौद्ध विहार; डॉ. आगलावेंचा दावा

दोन्ही फोनचे स्पेसिफिकेशन्स काय आहेत?

या दोन्ही फोनमध्ये जवळपास सारखेच फीचर्स आहेत. दोन्ही फोनमध्ये 6.6-इंचाचा 1080p LCD डिस्प्ले आहे, जो 144Hz रिफ्रेश रेटसह येतो. Xiaomi नुसार त्याचे पॅनल 30Hz पर्यंत जाऊ शकते. यामध्ये ग्राहकांना Mediatek Dimensity 8100 मिळेल. आम्ही तुम्हाला सांगतो की ही तीच चिप आहे जी रिअॅलिटी जीटी निओ 3 मध्ये देण्यात आली आहे.

Note 11T Pro+ ला 8GB RAM आणि 512GB पर्यंत स्टोरेज मिळते आणि Note 11T Pro+ ला 256GB पर्यंत स्टोरेज मिळते. यामध्ये MIUI आधारित Android 12 उपलब्ध आहे.

हेही वाचा: यासिन मलिक-मनमोहन सिंग यांचा फोटो व्हायरल, काय आहे त्या मागचं सत्य?

Note 11T Pro आणि Note 11T Pro + दोन्ही फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरे आहेत, ज्यात 64-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो शूटरचा समावेश आहे. त्याच वेळी, फोनच्या फ्रंटमध्ये 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी, Redmi Note 11T Pro + ला 4,400mAh बॅटरी मिळते, जी 120W फास्ट चार्जसह येते. हे मॉडेल Xiaomi च्या Surge P1 चिप डिझाइनसह येते. दुसरीकडे, Note 11T Pro मध्ये 5,080mAh बॅटरी आहे, जी 67W चार्जिंग सपोर्टसह येते.

Web Title: Redmi Note 11t Pro And Redmi Note 11t Pro Plus Launched Check Price And Specifications

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Technology
go to top