redmi note 12 vs realme 10 check comparision price specifications features
redmi note 12 vs realme 10 check comparision price specifications features

Redmi Note 12 vs Realme 10: दोन्हीत जोरदार स्पर्धा, जाणून घ्या काय आहे खास

Realme ने तिच्या Realme 10 सीरीजमधील पहिला स्मार्टफोन Realme 10 4G जागतिक बाजारात लॉन्च केला आहे. हा फोन परवडणाऱ्या किमतीत चांगल्या स्पेसिफिकेशन्ससह लॉन्च करण्यात आला आहे. Realmeचा हा फोन बाजारात आधीपासून उपलब्ध असलेल्या रेडमी नोट 12 स्मार्टफोनशी स्पर्धा करेल. चला जाणून घेऊया की Redmi Note 12 आणि Realme 10 मध्ये काय फरक आहे? चला त्यांची वैशिष्ट्ये, किंमत यांची तुलना पाहूया..

Redmi Note 12 vs Realme 10 - डिझाइन

Realme 10 स्मार्टफोन आकर्षक आणि उत्कृष्ट डिझाइनसह येतो. हा Realme फोन लेटेस्ट iPhone प्रमाणे फ्लॅट बॉर्डर आणि कॉम्पॅक्ट आकारासह येतो. फोनच्या मागील बाजूस दोन सर्कल देण्यात आले आहेत आणि मागील बाजूस दोन सेन्सर देखील आहेत. एकूणच, Realme 10 चे डिझाइन किमतीच्या दृष्टीने चांगले आहे. दुसरीकडे, Redmi Note 12 बद्दल बोलायचे झाले तर Xiaomi चा हा फोन उत्तम बिल्ड क्वालिटी ऑफर करतो. याला IP53 प्रमाणपत्र मिळते आणि हा फोन डस्ट प्रतिरोधक आणि स्प्लॅश प्रतिरोधक आहे. Redmi चा फोन Realme पेक्षा मोठा आणि कमी आकर्षक आहे.

redmi note 12 vs realme 10 check comparision price specifications features
Jay Shah Viral Memes: 'जय ऐवजी पराजय नाव ठेवायला पाहिजे होतं'

Redmi Note 12 vs Realme 10 - डिस्प्ले

Redmi Note 12 स्मार्टफोन 6.67-इंचाच्या AMOLED डिस्प्लेसह येतो. स्क्रीन फुलएचडी + 1080 x 2400 पिक्सेलचे रिझोल्यूशन देते. हँडसेटमध्ये 6.4-इंचाचा डिस्प्ले आहे जो फुलएचडी + रिझोल्यूशनसह येतो. संरक्षणासाठी गोरिल्ला ग्लास 5 देण्यात आला आहे.

Redmi Note 12 vs Realme 10 स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 12 स्मार्टफोनमध्ये 6nm आधारित Snapdragon 4 Gen 1 मोबाइल प्लॅटफॉर्म देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी Adreno 619 GPU उपलब्ध आहे. हा Redmi फोन 8 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेजसह येतो.

त्याच वेळी, Realme 10 स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G99 चिपसेट देण्यात आला आहे. Realme चा हा हँडसेट 8 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेज ऑफर करतो. फोन Android 12 सह येतो आणि दोन प्रमुख Android अपग्रेड्सचा मिळेल असा दाव कंपनी करते.

redmi note 12 vs realme 10 check comparision price specifications features
Car Buying Tips: मारुती सुझुकी स्विफ्ट की टाटा टियागो? स्वस्तात चांगली कार कोणती? जाणून घ्या

Redmi Note 12 vs Realme 10 -कॅमेरा

Realme 10 स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा मिळतो

त्याच वेळी, Redmi Note 12 मध्ये मेगापिक्सेल प्राइमरी कॅमेरासह 48 मेगापिक्सलचा फ्रंट सेंसर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर उपलब्ध आहे.

redmi note 12 vs realme 10 check comparision price specifications features
Patanjali: भाजप शासित राज्यात रामदेव बाबांना मोठा झटका! 'या' 5 औषधांच्या उत्पादनावर बंदी

Redmi Note 12 vs Realme 10 बॅटरी

Redmi Note 12 आणि Realme 10 स्मार्टफोनमध्ये समान क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. दोन्ही हँडसेटला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Redmi Note 12 vs Realme 10 - किंमत

Redmi Note 12 स्मार्टफोनची किंमत $190 (सुमारे 15,000 रुपये) आहे तर Realme 10 भारतात सुमारे 14,500 रुपयांना लॉन्च केला जाऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com