Jay Shah Viral Memes: 'जय ऐवजी पराजय नाव ठेवायला पाहिजे होतं' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

t20 world cup 2022 team india loss BCCI Jay Shah got trolled after loss in  semi final social media memes viral

Jay Shah Viral Memes: 'जय ऐवजी पराजय नाव ठेवायला पाहिजे होतं'

इंग्लंडविरुद्धच्या सेमी फायनलमध्ए दहा गडी राखून झालेल्या पराभवाने भारतीय संघाचे 11 वर्षांनंतर आयसीसी विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न भंगले आणि जगभरातील कोट्यवधी भारतीयांची मनेही मोडली आहेत. प्रथमच आयसीसी स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करणारा रोहित शर्मा उपांत्य फेरीतील पराभवामुळे खूपच निराश झाला आहे.

दरम्यान आजच्या पराभवाचे खापर कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजांवर फोडले आहे. मात्र भारताच्या दारून पराभवानंतर भाजप नेते अमित शाह यांचे पुत्र आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना ट्विटरवर ट्रोल केलं जात आहे.

हेही वाचा: END vs IND : 'बॅगा भरा घरी या...' चाहते खेळाडूंवर भडकले, सोशल मीडियावर Memes चा पाऊस

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीची ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी नेत्रदीपक होती. सुर्यकुमार यादवने दखील चांगली कामगीरी केली. मात्र सेमी फायनलमध्ये भारतीय गोलंदाजांना एकही विकेट घेता आली नाही, त्यामुळे मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. आज नेटकऱ्यांकडून जय शाहा यांच्याबद्दल अनेक मजेशिर मीम्स पोस्ट करण्यात येत आहेत.

हेही वाचा: 'घरी परत या'; ड्रिम 11च्या CEOची अमेरिकेत नोकरी गमावलेल्या भारतीयांना ऑफर

एका यूजरने एक मीम पोस्ट केली आहे ज्यामध्ये एक वर्ल्डकप जिंकून देऊ शकता नाही तू? तुझं नाव जय शाह नाही पराजय ठेवलं पाहीजे होतं" असा मजकूर लिहीला असून सोबत अमित शाह आणि जय शाह यांचा फोटो पोस्ट केला आहे.

एका नेटकऱ्यांने गॅंग्ज ऑफ वासेपूर या चित्रपटातील मीम पोस्ट केली आहे.

हेही वाचा: IND vs ENG : आता फायलनमध्ये इंग्लंडसाठी टाळ्या वाजवा! बाद फेरीत टीम इंडिया नापास

अनेकांनी अमित शाह यांच्या संदर्श देत अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

टॅग्स :Amit ShahBCCI