JioHotstar Domain : अखेर रिलायन्सला JioHotstar डोमेन परत मिळालंच! पण कसं? वाचा संपूर्ण प्रकरण

Reliance acquires JioHotstar domain : रिलायन्स इंडस्ट्रीजने अखेर JioHotstar डोमेन ताब्यात घेतले आहे, जे आधी दिल्लीतील एका ॲप डेव्हलपरच्या नावावर नोंदणीकृत होते.
JioHotstar Most expensive domain
Reliance JioHotstar Domainesakal
Updated on

JioHotstar Most expensive domain : रिलायन्स इंडस्ट्रीजने अखेर JioHotstar डोमेन ताब्यात घेतले आहे, जे आधी दिल्लीतील एका ॲप डेव्हलपरच्या नावावर नोंदणीकृत होते. या डेव्हलपरने रिलायन्सकडे आपल्या शिक्षणासाठी निधी मागणी केली होती, त्याच्या मोबदल्यात हे डोमेन देण्याची तयारी दर्शवली होती. हा व्यवहार चर्चेचा विषय ठरला असून, यामुळे डोमेन विक्रीच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या क्षणाची नोंद झाली आहे.

JioHotstar डोमेनचा प्रवास 20 सप्टेंबर 2023 रोजी सुरू झाला. या डोमेनचे प्रारंभिक मालक दिल्लीतील एक डेव्हलपर होता, ज्याने रिलायन्सकडे संपर्क साधून आपल्या शिक्षणासाठी निधीची मागणी केली. मात्र, नंतर हे डोमेन दुबईतील जैनम आणि जीविका नावाच्या भावंडांकडे गेले. त्यांनी हे डोमेन रिलायन्सला कोणत्याही शुल्काशिवाय देण्याची तयारी दाखवली.

या भावंडांनी त्यांच्या वेबसाईटवर नमूद केले की, रिलायन्स आणि Disney+ Hotstar विलीनीकरणाच्या पार्श्वभूमीवर हे डोमेन रिलायन्सकडे असणे अधिक योग्य ठरेल. त्यांनी हे डोमेन देताना सर्व आवश्यक कागदपत्रे पूर्ण केली आणि कोणत्याही आर्थिक लाभाची अपेक्षा न करता ते रिलायन्सला सुपूर्द केले.

JioHotstar Most expensive domain
Whatsapp Security Tips : व्हॉट्सॲप कॉल वरून काढता येतं तुमचं लोकेशन; पटकन बदला ही सेटिंग, नाहीतर होईल पश्चाताप

जगातील सर्वात महागडे डोमेन कोणते?

JioHotstar डोमेनसाठी रिलायन्सने किती रक्कम मोजली याची अधिकृत माहिती नाही. परंतु, जगातील सर्वात महागड्या डोमेनची नोंद Voice.com या डोमेनने केली आहे. हे डोमेन मे 2019 मध्ये तब्बल $30 दशलक्ष (सुमारे ₹254 कोटी) मध्ये विकले गेले होते. या डोमेनचा वापर ब्लॉकचेनवर आधारित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू करण्यासाठी करण्यात आला होता.

JioHotstar डोमेनची सध्याची स्थिती

सध्या JioHotstar डोमेनचे मालक Viacom18 Media Pvt. Ltd. आहेत, जे मुकेश अंबानींच्या व्यवसायाचा फार मोठा भाग आहेत. या डोमेनवर लवकरच नवीन सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, Jiostar.com नावाची नवीन वेबसाईट लवकरच येत आहे अशा घोषणेने चर्चेत आहे.

JioHotstar Most expensive domain
Pushpa 2 Ticket Booking : 'पुष्पा 2' चित्रपटाच्या तिकीटांवर 50% पर्यंत सूट! इथे करा झटपट बुकिंग

डिजिटल युगातील डोमेनचे महत्त्व

डोमेन हे केवळ इंटरनेटवरचे नाव नसून, मोठ्या ब्रँडसाठी एक अमूल्य आहे. JioHotstarच्या प्रकरणातून डोमेनची किंमत आणि त्यामागील रणनीतीची महत्त्वाची झलक दिसून येते. रिलायन्सच्या या डोमेन ताब्यामुळे डिजिटल स्पर्धेत आणखी एक मोठी पायरी गाठली गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com