Jio Fiber Plan : डेटासह मिळतं OTT प्लॅटफॉर्म-500 हून अधिक TV चॅनेलचे फ्री सबस्क्रिप्शनसब अन् बरंच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jio in flight plans let users access internet during flight check list of plans benefits here

Jio Fiber Plan : डेटासह मिळतं OTT प्लॅटफॉर्म-500 हून अधिक TV चॅनेलचे फ्री सबस्क्रिप्शनसब अन् बरंच

रिलायन्स जिओ त्याच्या ब्रॉडबँड ग्राहकांसाठी अनेक जिओ फायबर प्लॅन ऑफर करते. Jio Fiber ग्राहकांना 30Mbps, 100Mbps आणि 150Mbps च्या स्पीडवर अमर्यादित डेटा ऑफर केला जातो. रिलायन्स जिओ 100Mbps स्पीडसह 3 ब्रॉडबँड प्लॅन ऑफर करते. त्यांची किंमत अनुक्रमे899 रुपये, 799 रुपये और 699 रुपये आहे. Jio Fiber च्या 899 रुपये आणि 799 रुपयांच्या प्लॅनमध्ये मोफत OTT ऍक्सेस देखील उपलब्ध आहे.

जर तुम्हाला ऑनलाइन कंटेन्ट पाहण्याची आवड असेल आणि तुम्हाला Disney + Hotstar, Sony Liv सारखे OTT प्लॅटफॉर्म फ्री पाहयचे असतील, तर तुम्ही Jio Fiber चा 899 रुपयांचा प्लॅन घेऊ शकता. आज आपण 899 रुपयांच्या Jio फायबर प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत.

जिओ फायबर 899 रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओच्या 899 रुपयांच्या जिओ फायबर प्लॅनची वैधता एक बिल सायकल आहे. या प्लॅनमध्ये 100Mbps च्या स्पीडने इंटरनेट डेटा देण्यात येतो. या प्रीपेड प्लॅनमध्ये 100Mbps ची डेटा अपलोड आणि डाउनलोड स्पीड मिळते. Jio Fiber च्या या प्रीपेड प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल ऑफर केले जातात .

याशिवाय, रिलायन्स जिओ फायबरचा 899 रुपयांचा प्लॅन 550 हून अधिक टीव्ही चॅनेल्सचा एक्सेस देखील देतो.

हेही वाचा - इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

हेही वाचा: Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या बदलीमागे तानाजी सावंत? 'त्या' पत्रातून मोठा खुलासा

Jio Fiber च्या या 899 रुपयांच्या प्लॅनमध्ये Disney + Hotstar, Sony Liv आणि ZEE5 चे सबस्क्रिप्शन देखील मोफत दिले जाते. याशिवाय VOOT सिलेक्ट, Voot Kids यासह एकूण 15 OTT प्लॅन्सची सदस्यता देखील फ्री आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की Jio Fiber च्या या प्लॅनची ​​किंमत 699 रुपये आहे आणि कंपनी अतिरिक्त 14 OTT अॅप्ससाठी ग्राहकांकडून 200 रुपये आकारते.

हेही वाचा: Electric Scooter : सिंगल चार्जमध्ये चालते 140 किमी, जाणून घ्या Hero Optima ची किंमत अन् फीचर्स

999 रुपयांचा जिओ फायबर प्लॅन

रिलायन्स जिओचा 999 रुपयांचा प्लॅन देखील आहे ज्यामध्ये ग्राहकांना प्राइम व्हिडिओ, डिस्ने + हॉटस्टारसह एकूण 15 OTT अॅप्सची सदस्यता आणि अमर्यादित डेटा ऑफर केला जातो.

टॅग्स :Jio