Jio-Airtel-Vi चे प्रीपेड प्लॅन पुन्हा महागणार; होणार 10-12 टक्के वाढ

reliance jio airtel and vodafone idea may increase prepaid tariffs up to 12 per cent
reliance jio airtel and vodafone idea may increase prepaid tariffs up to 12 per cent

रिलायन्स जिओ (Jio), व्होडाफोन-आयडिया (Vi) आणि एअरटेल (Airtel) सारख्या खाजगी टेलिकॉम कंपन्या पुन्हा एकदा त्यांच्या ग्राहकांना मोठा धक्का देणार आहेत. ताज्या रिपोर्टनुसार, या तिन्ही कंपन्या दिवाळीच्या मुहूर्तावर त्यांच्या प्रीपेड प्लॅनच्या किमती वाढवू शकतात. कंपन्यांचे रिचार्ज प्लॅन 10 ते 12 टक्क्यांनी महागणार आहेत. यापूर्वी या तिन्ही कंपन्यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांचे प्रीपेड प्लॅन महाग केले होते.

ईटी टेलिकॉमच्या या रिपोर्टमध्ये अमेरिकन इक्विटी रिसर्च फर्म, विल्यम ओ'नील अँड कंपनीच्या भारतीय युनिटमधील इक्विटी रिसर्चचे प्रमुख मयुरेश जोशी यांचा हवाला दिला आहे. टेलिकॉम कंपन्या पुन्हा एकदा 10 ते 12 टक्क्यांनी वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे Airtel, Jio आणि Vodafone Idea चे ARPU (अव्हरेज रिव्हेन्यु पर यूजर) अनुक्रमे 200 रुपये, 185 रुपये आणि 135 रुपये वाढेल.

नोव्हेंबर 2021 मध्ये, Airtel आणि Vodafone Idea ने प्रीपेड टॅरिफ 20-25 टक्क्यांनी वाढवले ​​होते. यानंतर रिलायन्स जिओकडूनही असाच निर्णय घेण्यात आला आहे. दरवाढीमुळे प्लॅन 79 रुपयांवरून 99 रुपयांपर्यंत वाढला. एअरटेलचा 2GB प्रतिदिन प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह 698 रुपयांवरून 839 रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

reliance jio airtel and vodafone idea may increase prepaid tariffs up to 12 per cent
आता WhatsAppवरून डाउनलोड करता येतील पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स

एअरटेलच्या सीईओने दिले संकेत

अलीकडेच एअरटेलचे सीईओ गोपाल विट्टल यांनी प्रीपेड प्लॅनच्या किमती वाढवण्याचे संकेत दिले होते. कंपनीच्या सीईओने सांगितले की एअरटेललाअव्हरेज रिव्हेन्यु पर यूजर वाढवायचा आहे, ज्यासाठी 2022 मध्ये प्रीपेड प्लॅन पुन्हा एकदा महाग केल्या जाऊ शकतात.

reliance jio airtel and vodafone idea may increase prepaid tariffs up to 12 per cent
'जावा' या प्रोग्रामिंग भाषेचं नाव कसं पडलं माहितीये का ?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com