'जावा' या प्रोग्रामिंग भाषेचं नाव कसं पडलं माहितीये का ?

जेम्स गोसालिंगने त्याच्या ऑफिससमोर असलेल्या ओक वृक्षावरून या भाषेला ओक असे नाव दिले होते. काही कालावधीनंतर या भाषेला ग्रीन असे नाव पडले. काही दिवसांनी हे नाव बदलून जावा असे नाव देण्यात आले.
java
javagoogle

मुंबई : JAVA ही एक ऑब्जेक्ट ओरिएंटेड (OBJECT ORIENTED) प्रोग्रामिंग भाषा आहे. या जावाची पहिली आवृत्ती २३ मे १९९५ रोजी मध्ये बाजारात आणली गेली. जावा प्लॅटफार्म मुक्त (PLATFORM INDEPENDENT) भाषा आहे.

जेम्स गोसालिंग, माइक शेरिडन, पॅट्रिक नॉघटन यांनी १९९१ ला सन माइक्रोसिस्टम मध्ये जावा प्रोजेक्टची सुरुवात केली. सर्वप्रथम जावाचे नाव ओक असे होते. जेम्स गोसालिंगने त्याच्या ऑफिससमोर असलेल्या ओक वृक्षावरून या भाषेला ओक असे नाव दिले होते. काही कालावधीनंतर या भाषेला ग्रीन असे नाव पडले. काही दिवसांनी हे नाव बदलून जावा असे नाव देण्यात आले. जावा हे नाव जावा कॉफी वरून घेतलेलं आहे. कॉफी ही सर्वच प्रोग्रामरची प्रथम पसंती असते म्हणूनच जावा हे नाव कॉफीवरून देण्यात आलं.

java
Bhai Lang : दोन भारतीय इंजीनिअर्संनी मिळून तयार केली नवी प्रोग्रामिंग भाषा

सी, फोरट्रान, Smalltalk, पर्ल अशा अनेक भाषांप्रमाणेच जावा ही तिसऱ्या पिढीची भाषा आहे. जावा मध्ये आपण बऱ्याच प्रकारचे प्रोग्राम लिहू शकतो. गेम्स तयार करणे, एखादी स्ट्रिंग छोटी करणे, कोणतेही कॅलक्युलेशन करणे किंवा डाटा स्टोअर करणे अशा प्रकारची सॉफ्टवेअर आपण जावाच्या मदतीने बनवू शकतो. सी आणि जावा या दोन निराळ्या भाषा आहेत. सी आणि सी++ माहिती असणाऱ्यांना जावा शिकण्यास नक्कीच मदत होते, परंतु जावा समजण्यासाठी सी शिकण्याची काहीच गरज नाही.

जावामध्ये इतर भाषांपेक्षा एक वेगळी खासियत आहे, ती म्हणजे जावा मध्ये एक विशिष्ट प्रोग्राम लिहिता येतो त्याला आपण अप्लेट (APPLET) असे म्हणतो. Applet ला इंटरनेट वरून डाऊनलोड केलं जाऊ शकतं किंवा एखाद्या वेब ब्राउजर मध्ये सुरक्षित रन करता येतं. पारंपरिक कॉम्प्युटरमध्ये सुरक्षिततेविषयी समस्या होती. इंटरनेटवरील साईट आपल्या कॉम्प्युटरला जास्त एक्सेस करू शकत होती. परंतु जावाने या समस्येचे निवारण केले.

जावा Applet च्या क्षमतेवर निर्बंध घालते. या मार्गाने जावा समस्येचे निवारण करते. एक जावा एप्लेट युजरच्या मदतीशिवाय हार्ड डिस्क मध्ये काहीही लिहू शकत नाही. हे एप्लेट अनियंत्रितपणे कॉम्प्युटरच्या मेमरी मध्ये काहीही लिहू शकत नाही आणि त्यामुळे कॉम्प्युटर सुरक्षित राहतो.

जावामध्ये एप्लेट प्रमाणेच अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे JVM (जावा वर्चुअल मशिन) ज्याच्यामुळे जावा platform independent आहे. जावा PLATFORM INDEPENDENT असल्यामुळे जावामध्ये लिहिलेला प्रोग्राम आपण JVM इन्स्टॉल्ड असलेल्या कोणत्याही कार, माइक्रोवेव किंवा कॉम्प्युटरवर रन करू शकतो.

TYPES OF JAVA APPLICATION (जावा एप्लिकेशन्स चे प्रकार)

जावा एप्लिकेशनचे प्रामुख्याने चार प्रकार पडतात.

१. Standalone Application :

यालाच आपण DESKPTOP-APPLICATION किंवा WINDOW-BASED APPLICATION असे म्हणतो. मीडिया प्लेयर, अँटीव्हायरस इत्यादी प्रत्येक मशीनवर इन्स्टाल करावी लागणारी सोफ्टवेअर STANDALONE APPLICATION या प्रकारात मोडतात. जावामधे STANDALONE APPLICATION तयार करण्यासाठी AWT आणि SWING वापरले जाते.

२. Web Application:

सर्व्हर साईडला रन होणाऱ्या आणि डायनामिक पेजेस तयार करणार्या एप्लिकेशन्सना WEB APPLICATION असे म्हणतात. सध्या जावामध्ये WEB APPLICATION तयार करण्यासाठी SERVLET, JSP, STRUTS, JSF इत्यादी तंत्रज्ञान वापरले जाते.

३. Enterprise Application:

हे एक व्यावसायिक एप्लिकेशन आहे. उच्च स्तरीय सुरक्षा हा या एप्लिकेशन चा प्रमुख फायदा आहे. त्यामुळेच हे एप्लिकेशन बँकिंग एप्लीकेशानासारखी सुरक्षित सोफ्टवेअर्स तयार करण्यासाठी वापरतात. ENTERPRISE APPLICATION तयार करण्यासाठी जावामध्ये EJB (ENTERPRISE JAVA BEANS ) हे तंत्रज्ञान वापरले जाते.

४. Mobile Applicaion:

हे मोबाइल डिव्हाइसेस साठी तयार केलेले एप्लिकेशन आहे. सध्या मोबाइल एप्ल्केशन्स तयार करण्यासाठी ANDROID आणि JAVA ME (MICRO EDITION ) वापरले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com