जिओकडे आहे स्वस्त प्लॅन्सची मोठी लिस्ट, किंमत १४९ रुपयांपासून सुरू; फायदे जबरदस्त | Jio Plans | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jio Recharge

Jio Plans: जिओकडे आहे स्वस्त प्लॅन्सची मोठी लिस्ट, किंमत फक्त १४९ रुपयांपासून सुरू; फायदे जबरदस्त

Jio Prepaid Recharge Plans: देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स जिओकडे ग्राहकांसाठी एकापेक्षा एक शानदार प्लॅन्स उपलब्ध आहे. कंपनीकडे डेटा पॅकपासून ते ४जी अनलिमिटेड प्लॅन्स उपलब्ध आहेत. या प्लॅन्समध्ये तुम्हाला अनलिमिटेड डेटा, कॉलिंग आणि एसएमएससह अनेक फायदे मिळतील. Jio कडे उपलब्ध असलेल्या अशाच काही स्वस्त प्लॅन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचाः काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

Jio चा २०९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

Jio कडे २०९ रुपये किंमतीचा शानदार प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला २८ दिवसांसाठी दररोज १ जीबी डेटाचा फायदा मिळेल. हा डेटा समाप्त झाल्यावर ६४ केबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट वापरू शकता. याशिवाय, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएस देखील मिळतात. याशिवाय, JioTV, JioCinema, JioCloud आणि JioSecurity सारख्या अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळेल.

Jio चा १७९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

Jio च्या १७९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये देखील तुम्हाला अनेक शानदार फायदे मिळतील. या प्लॅनची वैधता २४ दिवस आहे. यामध्ये दररोज १ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएसची देखील सुविधा दिली जाते. हा प्लॅन देखील JioTV, JioCinema, JioCloud आणि JioSecurity च्या मोफत सबस्क्रिप्शनसह येतो.

हेही वाचा: NASA News : चंद्रावर घर बांधायचंय 2030 पर्यंत थांबा, नासाचा आत्मविश्वासपूर्ण दावा

Jio चा १४९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

तुम्ही जर स्वस्त प्लॅन शोधत असाल तर जिओकडे १४९ रुपयांचा प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये दररोज १ जीबी डेटा दिला जातो. हा डेटा समाप्त झाल्यास ६४ केबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट वापरू शकता. या प्लॅनची वैधता २० दिवस आहे. तसेच, जिओ अ‍ॅप्सचे देखील मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते. तुम्ही जर दररोज १ जीबी डेटा ऑफर करणारे प्लॅन्स शोधत असाल तर हे रिचार्ज तुमच्या फायद्याचे ठरतील.