NASA News : चंद्रावर घर बांधायचंय 2030 पर्यंत थांबा, नासाचा आत्मविश्वासपूर्ण दावा

स्वप्नवत वाटावा असा दावा नासाच्या एका शास्त्रज्ञाने केला आहे की, 2030 पर्यंत मानव चंद्रावर राहू शकेल आणि काम करु शकेल.
NASA News
NASA Newsesakal

Human on Moon NASA News : अंतराळात अनेक रहस्य आहेत. मानव कायमच त्याचा शोध घेत असतो. त्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याला नवीन काहीतरी गवसतं. असाच एक स्वप्नवत वाटावा असा दावा नासाच्या एका शास्त्रज्ञाने केला आहे की, 2030 पर्यंत मानव चंद्रावर राहू शकेल आणि काम करु शकेल.

पृथ्वी व्यतिरिक्त इतर ग्रहांवर मानवाला राहता येईल का याबाबतही संशोधन सुरु आहे. त्यातच आता नासाच्या शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे की, 2030 पर्यंत मानव चंद्राच्या पृष्ठभागावर राहू शकेल.

आर्टेमिस-1 मोहिमेअंतर्गत चंद्राच्या दिशेने सोडण्यात आलेल्या ओरियन स्पेसक्राफ्ट कार्यक्रमाचे प्रमुख हॉवर्ड हू यांनी सांगितलं की, आम्ही पुढील आठ वर्षांमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर माणसांना पाठवणार आहोत. हे लोक तिथे जाऊन वैज्ञानिक प्रयोग करतील.

NASA News
NASA News : पृथ्वीच्या दिशेनं येतोय भला मोठा लघुग्रह, नासाने व्यक्त केली भीती

नासाने अलीकडेच आपल्या शक्तिशाली स्पेस लॉन्च सिस्टम (SLS) रॉकेटद्वारे ओरियन अंतराळयान चंद्राच्या दिशेने पाठवलं आहे. ओरियन अंतराळयान सध्या चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत आहे. या उपग्रहाचं प्रक्षेपण अनेकवेळा पुढे ढकललं गेलं होतं, त्यानंतर गेल्या आठवड्यात ते लाँच करण्यात आलं. सुमारे 50 वर्षांनंतर नासा चंद्राच्या दिशेने मानवी मोहीम सुरू करत आहे. सध्या जे ओरियन अंतराळयान चंद्राभोवती फिरत आहे, त्यामध्ये मानव नाही. पण त्याच अंतराळयानातून भविष्याच मानवाला चंद्रावर पाठवलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.

NASA News
Nasa's Orion capsule : कामगिरी फत्ते! नासाची ओरिअन कॅप्सुल पोहोचली चंद्रावर; 50 वर्षांनंतर पुन्हा ऐतिहासिक नोंद

चंद्रावरून मंगळावर रॉकेट लाँच करण्याचा विचार

नासाकडून सध्या ओरियन अंतराळयानाची चाचणी सुरु आहे. या चाचणीमध्ये ओरियन अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचून, चंद्राला प्रदक्षिणा घालून पुन्हा पृथ्वीवर सुखरुप परत येईल का हे तपासलं जात आहे. या अंतराळयानातून भविष्यात अंतराळयात्रींना चंद्रावर पाठवण्याची नासाची योजना आहे.

NASA News
Nasa : नासाच्या स्पेस टेलिस्कोपची कमाल; ३ दशकानंतर टिपले नेपच्यून ग्रहाचे तेजस्वी वलय

जर ही मोहिम यशस्वी झाली तर 1972 नंतर पहिल्यांदा मानव चंद्रावर पाऊल ठेवेल. या अंतराळयात्रींमध्ये पुरुष आणि महिला यात्रींचा समावेश असेल. अंतराळयात्रींना चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवलं जाईल. हे अंतराळयात्री चंद्रावरील पाणी आहे का हे शोधतील. जर चंद्रावर पाण्याचे स्रोत सापडले तर चंद्रावरून मंगळावर रॉकेट लाँच करता येईल.

चंद्राचा वापर पृथ्वी आणि मंगळ ग्रह यांच्यामधील दुवा

याचा अर्थ असा की, चंद्राचा वापर पृथ्वी आणि मंगळ ग्रह यांच्यामधील दुवा म्हणून केला जाईल. मानवाला चंद्रावर राहता यावं यासाठी हे पहिलं पाऊल असल्याचं हॉवर्ड हू यांनी सांगितलं आहे. चंद्रावर कायमस्वरूपी राहण्यासाठी मानवाला राहण्याची जागा बनवावी लागेल. यासाठी अनेक प्रकारचे वैज्ञानिक प्रयोग करावे लागतील. जर आपल्याला या प्रयत्नात यश मिळालं तर आपण चंद्रावर मानवी वसाहत तयार करु शकू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com