रिलायन्सचा स्वस्त JioPhone 5G स्मार्टफोन 'या' महिन्यात होऊ शकतो लॉन्च

एका रिपोर्टनुसार, रिलायन्स जिओ आपला स्वस्त 5G फोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे
रिलायन्सचा स्वस्त JioPhone 5G स्मार्टफोन 'या' महिन्यात होऊ शकतो लॉन्च

5G लिलाव संपला आहे. आता कंपनी 5G सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे. पण, स्मार्टफोन कंपन्या आधीच 5G स्मार्टफोन लॉन्च करत आहेत. त्याची किंमत परवडणाऱ्या श्रेणीपेक्षा किंचित जास्त आहे. एका रिपोर्टनुसार, रिलायन्स जिओ आपला स्वस्त 5G फोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिलायन्स या महिन्यात JioPhone SG लाँच करू शकते. हा फोन खूपच स्वस्त असू शकतो. कंपनी 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत JioPhone 5G सादर करू शकते.

JioPhone 5G चे स्पेसिफिकेशन्स

JioPhone 5G मध्ये Qualcomm Snapdragon 480 प्रोसेसर वापरू शकते. यात 4GB पर्यंत रॅम आणि 32GB पर्यंत इंटरनल मेमरी दिली जाऊ शकते. त्याचबरोबर, असे मानले जात आहे की, 2GB रॅम वेरिएंट असलेला फोन देखील लॉन्च केला जाऊ शकतो.

JioPhone 5G मध्ये 6.5-इंचाची HD IPS LCD स्क्रीन दिली जाऊ शकते. या फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देखील दिला जाऊ शकतो. त्याचा एक कॅमेरा 13-मेगापिक्सलचा असू शकतो. यासोबत 2-मेगापिक्सलचा मेको सेन्सर दिला जाऊ शकतो. परवडणारा हा फोन कंपनीच्या Pragati OS वर काम करू शकतो. ही ऑपरेटिंग सिस्टम सध्या JioPhone Next मध्ये देखील वापरली जात आहे.

रिलायन्सचा स्वस्त JioPhone 5G स्मार्टफोन 'या' महिन्यात होऊ शकतो लॉन्च
Jio चे दमदार रीचार्ज प्लॅन, फ्री ओटीटी सबस्क्रिप्शन मिळेल 150GB डेटा

JioPhone 5G ची अपेक्षित किंमत

JioPhone 5G बद्दल असे सांगितले जात आहे की, त्याची किंमत 12,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते. हा स्मार्टफोन रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सादर केला जाऊ शकतो.

कंपनीने गेल्या वर्षी याच पद्धतीने JioPhone Next सादर केले होते. मात्र, घटकांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. मग कंपनी ते कसे हाताळते? हे पाहणे देखील महत्वाचे असेल. त्याचबरोबर, कंपनी या आगामी फोनला फायनान्स पर्यायासह ऑफर करते. ज्यामध्ये तुम्ही ते सुलभ हप्त्यांवर खरेदी करू शकता.

रिलायन्सचा स्वस्त JioPhone 5G स्मार्टफोन 'या' महिन्यात होऊ शकतो लॉन्च
Airtel Vs Jio Vs Vi : सर्व कंपन्यांचे दररोज 2GB डेटा प्लॅन, अमर्यादित कॉलिंग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com