जिओचे वर्षभर चालणारे दोन प्लॅन, तुमच्यासाठी कोणता आहे बेस्ट? वाचा | Jio Annual Recharge Plans | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

reliance jio prepaid plan of 2999 rupee and 3119 rupee with 365 days validity check recharge plan comparison

जिओचे वर्षभर चालणारे दोन प्लॅन, तुमच्यासाठी कोणता आहे बेस्ट? वाचा

reliance jio prepaid plan: रिलायन्स जिओ (Reliance Jio) कडे वर्षभर (365 दिवस) चालणारे 4 रिचार्ज प्लॅन आहेत. या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज तुम्हाला 1.5GB ते 3GB डेटा मिळतो. आज आपण रिलायन्स जिओच्या 2 वार्षिक रिचार्ज प्लॅनची तुलना पाहाणार असून आपण Jio च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये 120 रुपये कमी खर्च करूनही 170GB अधिक डेटा कसा मिळवू शकता ते जाणून घेणार आहोत. आपण Jio च्या 2999 रुपये आणि 3119 रुपयांच्या प्लॅनची तुलना पाहाणार आहोत.

2999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 912.5GB डेटा

365 दिवसांची म्हणजेच वर्षभराची वैधता रिलायन्स जिओच्या 2999 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन (Prepaid Plan) मध्ये उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2.5GB डेटा दिला जातो. म्हणजेच प्लॅनमध्ये एकूण 912.5GB डेटा उपलब्ध आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा लाभ मिळतो. सोबतच प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे. म्हणजेच या प्लॅनमध्ये 36500 एसएमएस पाठवले जाऊ शकतात. याशिवाय प्लॅनमध्ये जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.

3119 रुपयांच्या प्लॅनमध्ये 740 GB डेटा

जिओ (jio) चा 3119 रुपयांचा रिचार्ज हा देखील वार्षिक प्लॅन आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा दिला जातो. याशिवाय 10GB डेटाही मिळतो. म्हणजेच Jio च्या या प्लॅनमध्ये वर्षभर 740GB डेटा मिळतो. प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे. तसेच दररोज 100 एसएमएस पाठवता येतात. म्हणजेच तुम्ही एका वर्षात 36500 एसएमएस पाठवू शकता. महत्वाचे म्हणजे डिस्ने + हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन प्लॅनमध्ये 1 वर्षासाठी फ्री उपलब्ध आहे. तसेच, Jio अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील फ्री आहे.

हेही वाचा: Jio vs Airtel vs Vi : 500 रुपयांत मिळणारे बेस्ट कॉलिंग, डेटा प्लॅन्स

जर तुम्ही Jio च्या 2999 रुपयांच्या आणि 3119 रुपयांच्या प्लॅनची ​​तुलना केली तर 2999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 120 रुपये कमी खर्च करून अधिक डेटा मिळतो. 2999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 3119 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनपेक्षा 172.5GB अधिक डेटा मिळतो. तर, या दोन प्लॅनमधील एक प्रमुख फरक म्हणजे 3,119 रुपयांचा प्लॅन हा Disney + Hotstar मोबाईलचे 1 वर्षासाठी फ्री सबस्क्रिप्शन ऑफर करतो. तर 2999 रुपयांच्या प्लॅनमध्ये हा लाभ दिला जात नाही.

हेही वाचा: 'या' इलेक्ट्रिक स्कूटर्सची होतेय जोरदार विक्री, नोंदवली 366% वाढ

Web Title: Reliance Jio Prepaid Plan Of 2999 Rupee And 3119 Rupee With 365 Days Validity Check Comparison

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..