Reliance Jio Vs Airtel: महिन्याला फक्त 240 रुपयांमध्ये अनलिमेटेड कॉल्ससह बरंच काही, वाचा डिटेल्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

reliance jio vs airtel 719 rupees prepaid plan 84 days validity unlimited voice call 168gb data

Reliance Jio Vs Airtel: महिन्याला फक्त 240 रुपयांमध्ये अनलिमेटेड कॉल्ससह बरंच काही, वाचा डिटेल्स

Reliance Jio Vs Airtel: रिलायन्स जिओ आणि एअरटेलकडे अनेक जबरदस्त प्रीपेड प्लॅन आहेत ज्यांची किंमत सारखीच आहे. रिलायन्स जिओ आणि एअरटेलकडे 84 दिवसांच्या वैधतेसह 719 रुपयांचे रिचार्ज पॅक देखील आहेत. Jio आणि Airtel च्या या प्रीपेड पॅकमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल आणि डेटा सारख्या सुविधा उपलब्ध आहेत. आज आपण Jio आणि Airtel च्या या दोन प्लॅनबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत…

रिलायन्स जिओचा 719 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

रिलायन्स जिओच्या 719 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची ​​वैधता 84 दिवसांची आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच रिलायन्स जिओचे ग्राहक एकूण 168 जीबी डेटा वापरू शकतात. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर वेग 64Kbps पर्यंत कमी होतो.

रिलायन्स जिओच्या या प्रीपेड पॅकमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल देखील ऑफर केले जातात . ग्राहक देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर स्थानिक, एसटीडी आणि रोमिंग कॉल करू शकतात. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस मिळतात.

हेही वाचा: Cricket News : वर्ल्डकपमधील परभवानंतर BCCI चा दे धक्का! सर्वच सलेक्टर्सची केली हकालपट्टी

719 रुपयांचा एअरटेल प्रीपेड प्लॅन

एअरटेलच्या 719 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 84 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहक एकूण 126 जीबी डेटा वापरू शकतात. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर वेग 64Kbps पर्यंत कमी होतो.

एअरटेलच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल्स मोफत मिळतात. या प्लॅनमध्ये ग्राहक देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉल करू शकतात. याशिवाय या पॅकमध्ये 100 एसएमएसही मोफत दिले जातात.

हेही वाचा: MNS Vs Rahul Gandhi: मनसे शेगावात दाखल, पण कचोरीवर सेटलमेंटची शक्यता; ट्विटरवर Memes Viral

एअरटेलच्या या प्लॅनमध्ये Xtream मोबाइल पॅकचे सबस्क्रिप्शन 84 दिवसांसाठी उपलब्ध आहे. याशिवाय, रिवॉर्ड्समिनी सबस्क्रिप्शन, अपोलो 24|7 सबस्क्रिप्शन आणि फास्टॅगवर 100 रुपयांचा कॅशबॅक यांसारखे फायदे देखील उपलब्ध आहेत. हा Airtel रिचार्ज प्लॅन मोफत Hellotunes आणि Wynk Music मोफत सबस्क्रिप्शन देखील देते.