''या'' तीन टेलिकॉम कंपन्यांचे खास डेटा प्लॅन  

Reliance Jio vs Vodafone vs Airtel  Best Daily Data Prepaid Recharge Plans
Reliance Jio vs Vodafone vs Airtel Best Daily Data Prepaid Recharge Plans

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतातील टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन या कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून नवीन आणि खास डेटा प्लॅन आणले आहेत. या प्लॅनमध्ये १ जीबी पासून ३ जीबी पर्यंत डेटा ते देणार आहेत . आणि हो या प्लॅनची किंमत फक्त २९९ रुपयांपासून सुरूवात होणार आहे. 

देशाची फेमस टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन हे सर्व दर दिवशी १ जीबी पासून दररोज ३ जीबी डेटा पर्यंत विविध प्लॅन ऑफर करतात. आपल्या गरजेनुसार ग्राहक ते प्लॅन निवडतात. तरीसुद्धा कधीतरी काही कारणासाठी डेटा जास्त लागतो , तर त्यासाठी या तीन कंपन्याकडे अनेक प्लान आहेत. ज्यात सर्वात जास्त डेटा उपलब्ध होणारे हि प्लँन्स आहेत . 

Airtel चे 3GB डेटा प्लॅन
एअरटेलने  नुकतेच रोज 3 जीबी डेटाचे तीन प्लॅन ऑफर केली आहेत. ज्याची किंमत ३९८ रुपये, ४०१ रुपये आणि ४४९ रुपये आहे. ३९८ रुपये आणि ४०१ रुपयांच्या दोन्ही प्लॅनची वॅलिडिटी  २८ दिवस आहे. यातील ४०१ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला डिज्नी प्लस हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन  १ वर्षांपर्यंत  मिळते. तसेच ५६ दिवसांची वॅलिडिटी असलेला  ४४९ रुपयांचा प्लॅन आहे. एअरटेलच्या या तिन्ही प्लॅन्सवर  रोज १०० एसएसएस आणि सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार. 

रोज 3GB डेटा प्लॅन Reliance Jio चा 
३४९ रुपयांपासून  या जिओच्या रोजच्या ३ जीबी डेटा प्लॅनची सुरुवात होते. आणि ४०१ आणि ९९९ रुपयांचे दोन प्लॅन येतात. प्लॅनची  २८ दिवसांची वॅलिडिटी असलेले  ३४९ रुपये आणि ४०१ रुपयांचे दोन प्लॅन आहे. यामध्ये तुम्हाला एक हजार नॉन जिओ मिनिट्स मिळतात. तसेच ४०१ रुपयांच्या जर का प्लॅन घेतला तर तुम्हाला डिज्नी प्लस हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन सोबतच ६ जीबी पर्यंत एक्सट्रा  डेटाही मिळतो.

८४ दिवसांसाठी रोज ३ जीबी डेटा देणारा ९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ३००० नॉन जिओ मिनिट्स मिळतात. वरील सर्व जिओच्या प्लॅन्स मध्ये रोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मिळत असून  जिओ ते जिओवर अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा मिळणार. 

व्होडाफोनचे चे रोज 4GB डेटा प्लॅन
व्होडाफोनचे  २९९ रुपये, ४४९ रुपये आणि ६९९ रुपयांचे असे नवीन तीन डेटा प्लॅन आहेत. तसेच  दररोज २ जीबी डेटाचे हि प्लॅन आहेत. पण जात का तुम्ही डबल डेटा ऑफर प्लॅन सिलेक्ट केला तर तुम्हाला  दररोज  ४ जीबी डेटा मिळतो.

या तिन्ही व्होडाफोन प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, रोज १०० एसएमएस आणि व्होडाफोन प्ले व झी ५ अॅप्सचे सब्सक्रिप्शन सुद्धा फ्री मिळते. २८ दिवसांची वॅलिडिटी असलेला २९९ रुपयांचा प्लॅन असून ५६ दिवसांची वॅलिडिटी असलेला  ४४९ रुपयांचा प्लॅन आहे. तसेच  ६९९ रुपयांच्या या प्लॅनची वॅलिडिटी ८४ दिवसांची आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com