esakal | भारताचं पहिलं स्वदेशी सोशल मीडिया अ‍ॅप लॉन्च; जाणून घ्या फीचर्च अन् बरंच काही...
sakal

बोलून बातमी शोधा

Elyments, desi social media app, President Naidu

सध्याच्या घडीला आपल्याकडे फेसबुक, इंस्टाग्राम यांना चांगलीच लोकप्रियता आहे. या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला नवीन स्वदेशी Elyments अ‍ॅप कशी टक्कर देणार? हे येणारा काळच ठरवेल. 

भारताचं पहिलं स्वदेशी सोशल मीडिया अ‍ॅप लॉन्च; जाणून घ्या फीचर्च अन् बरंच काही...

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

गलवान खोऱ्यात भारतीय लष्करी जवान हुतात्मा झाल्यानंतर चीनविरोधातील वातावरण चांगलेच तापले आहे. लडाख सीमारेषेवर भारत-चीन यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीनंतर भारतात चीनविरोधात लाटच उसळली आहे. भारतात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहिम सुरु झाली. सामान्य जनतेकडून या मोहिमेला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असताना केंद्र सरकारने चिनी कंपनीच्या अ‍ॅपवर सर्जिकल स्ट्राइक केला. भारताली जवळपास 59 चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली. चिनी अ‍ॅपवर घातलेल्या बंदीनंतर देशवासियांना सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म देणारे पहिले स्वदेशी अ‍ॅप लॉन्च करण्यात आले आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते रविवारी देशातील पहिल्या अधिकृत सोशल मीडिया अ‍ॅप Elyments लाँच करण्यात आलं. 

आता करा स्मार्ट फेस मास्कद्वारे भाषांतर, कसे ? ते वाचा

देशातील जवळपास एक हजाहून अधिक आयटी तज्ज्ञांनी हे स्वदेशी अ‍ॅप डेव्हलप केले आहे. ही मंडळी श्री श्री रविशंकर यांच्या 'आर्ट ऑफ लिव्हिंग' संस्थेचे स्वयंसेवक देखील आहेत, अशी माहिती नायडू यांनी लॉन्चिंगवेळी दिली. सध्याच्या घडीला आपल्याकडे फेसबुक, इंस्टाग्राम यांना चांगलीच लोकप्रियता आहे. या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला नवीन स्वदेशी Elyments अ‍ॅप कशी टक्कर देणार? हे येणारा काळच ठरवेल. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

कसे आहे अ‍ॅप अन् काय आहेत यातील फिचर्स

Elyments अ‍ॅप 8 भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे. यात ऑडियो-व्हिडिओ कॉन्फरन्स कॉलिंग, मेसेजिंग आणि ग्रुप चॅटिंग, सोशल कनेक्टिव्हिटी, न्यूज अपडेट्ससासह Elyments Pay या फीचरद्वारे सुरक्षित ई-पेमेंट पर्यायही देण्यात आला आहे.  गूगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅप स्टोअरवर हे  उपलब्ध असून  आतापर्यंत एक लाखांहून अधिक लोकांनी अ‍ॅप डाउनलोड केलं आहे. युजर्सच्या प्रायव्हसीची विशेष काळजी घेण्यात आली असून वापरकर्त्यांची माहिती सुरक्षित राहिल, असा दावा अ‍ॅपच्या डेव्हलपर्संनी केला आहे.