Jio चा होळी धमाका! दररोज 2.5GB डेटा देणारे दोन नवे प्लॅन लॉन्च | Reliance JIO work from home plans | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Reliance JIO work from home plans
Jio चा होळी धमाका! दररोज 2.5GB डेटा देणारे दोन नवे प्लॅन लॉन्च

Jio चा होळी धमाका! दररोज 2.5GB डेटा देणारे दोन नवे प्लॅन लॉन्च

Reliance Jio Work from Home Plans: रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना होळीची खास भेट दिली आहे. रिलायन्स जिओनं दोन नवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च केले आहेत. कंपनीने हे दोन्ही प्लॅन्स वर्क फ्रॉम होम कॅटेगरीमध्ये (वर्क फ्रॉम होम डेटा पॅक) सादर केले आहेत. त्यांची किंमत 2,878 रुपये आणि 2,998 रुपये आहे. विशेष बाब म्हणजे यामध्ये तुम्हाला वर्षभरासाठी अनुक्रमे 2 GB आणि 2.5 GB डेटा मिळणार आहे. दोन्ही प्लॅन कंपनीच्या वेबसाइटवर अपडेट करण्यात आले आहेत. चला प्लॅन्सबद्दल अधिक तपशील जाणून घेऊया.

Jio चा 2,878 रुपयांचा WFH प्लॅन रु. -

रिलायन्स जिओचा 2878 रुपयांचा प्रीपेड प्लॅन ग्राहकांना 365 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा ऑफर करतो. म्हणजेच या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 730GB GB डेटा मिळेल. एकदा डेटा मर्यादा संपली की, स्पीड 64Kbps पर्यंत कमी होईल. हा वर्क फ्रॉम होम डेटा प्लान असल्याने, यात व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएससारखे फायदे मिळत नाहीत.

Jio चा 2,998 रुपयांचा WFH प्लॅन -

जिओच्या नवीन 2998 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह, वापरकर्त्यांना 365 दिवसांसाठी दररोज 2.5GB डेटा दिला जाईल. म्हणजेच एका वर्षात तुम्हाला एकूण 912.5GB डेटा मिळेल. एकदा डेटा मर्यादा संपली की, स्पीड 64Kbps पर्यंत कमी होईल. हा वर्क फ्रॉम होम डेटा प्लान असल्याने, यातही व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएससारखे फायदे मिळत नाहीत

Jio चे इतर वर्क फ्रॉम होम प्लॅन-

Jio कडे आणखी तीन वर्क फ्रॉम होम प्लॅन आहेत. 181 रुपये, 241 रुपये आणि 301 रुपयांचे हे तीन प्लॅन आहेत. हे तिन्ही प्लॅन ३० दिवसांच्या वैधतेसह येतात. 181 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 30 जीबी, 241 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 40 जीबी आणि 301 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 50 जीबी डेटा दिला जातो.