मेगा बचत! Airtel-Vi पेक्षा 100 रुपयांनी स्वस्त Jio प्लॅन, 75GB डेटा अन् Netflix देखील मोफत

Airtel आणि Vodafone Idea त्यांच्या ₹ 499 च्या पोस्टपेड प्लॅनमध्ये जी सुविधा देतात, Reliance Jio कडे फक्त ₹ 399 मध्ये उपलब्ध आहे.
Airtel, VI, Jio Plan Comparison
Airtel, VI, Jio Plan ComparisonSakal

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रीपेड प्लॅनच्या किमतीत वाढ झाल्यानंतर प्रीपेड आणि पोस्टपेड किमतींमध्ये फारसा फरक राहिलेला नाही. रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया आणि एअरटेल या तीनही टेलिकॉम कंपन्या 500 पेक्षा कमी किंमतीत पोस्टपेड प्लॅन ऑफर करतात. Airtel आणि Vodafone Idea त्यांच्या ₹ 499 च्या पोस्टपेड प्लॅनमध्ये जी सुविधा देतात, Reliance Jio कडे फक्त ₹ 399 मध्ये उपलब्ध आहे. येथे आपण या तिन्ही पोस्टपेड योजनांची तुलना करणार आहोत.

Airtel, VI, Jio Plan Comparison
किती GB रॅम असलेला स्मार्टफोन असतो बेस्ट? जाणून घ्या सर्वकाही

Airtel Rs 499 पोस्टपेड प्लॅन-

Airtel च्या ₹ 499 च्या महिन्याच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 75 GB डेटा दिला जातो. यामध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस पाठविण्याची सुविधा देखील आहे. याशिवाय, अमेझॉन प्राइम आणि डिस्ने प्लस हॉटस्टारवर 1 वर्षासाठी Wynk Music, Free Hello Tunes आणि Airtel Secure सारखं सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहेत.

व्होडाफोन आयडियाचा 499 रुपयांचा पोस्टपेड प्लान-

व्होडाफोन-आयडियाचा प्लॅनही जवळजवळ एअरटेलसारखाच आहे. यामध्ये दरमहा 75 जीबी डेटा, सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस पाठविण्याची सुविधा देखील आहे. याशिवाय Amazon Prime आणि Disney Plus Hotstar च्या एक वर्षाच्या सबस्क्रिप्शनसह हंगामा-2 म्युझिक (6 महिने) आणि Vi movies and TV सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.

Airtel, VI, Jio Plan Comparison
Airtel, Vi आणि Jio चे दररोज 2 GB डेटा देणारे बेस्ट रिचार्ज प्लॅन

रिलायन्स जिओचा 399 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन-

Airtel आणि Vodafone Idea च्या प्लॅनच्या तुलनेत रिलायन्स जिओचा 399 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन ऑफर करते. यामध्ये तुम्हाला एका महिन्यासाठी 75 GB डेटासह अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. विशेष बाब म्हणजे Amazon Prime, Disney + Hotstar आणि Jio अ‍ॅप्सच्या सबस्क्रिप्शन व्यतिरिक्त नेटफ्लिक्स मेंबरशिप देखील मोफत उपलब्ध आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com