esakal | ‘जिओफोन नेक्स्ट’साठी दिवाळीपर्यंत प्रतीक्षा; गणेश चतुर्थीचा मुहूर्त का टळला?
sakal

बोलून बातमी शोधा

‘जिओफोन नेक्स्ट’साठी दिवाळीपर्यंत प्रतीक्षा; गणेश चतुर्थीचा मुहूर्त का टळला?

‘जिओफोन नेक्स्ट’साठी दिवाळीपर्यंत प्रतीक्षा; गणेश चतुर्थीचा मुहूर्त का टळला?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : जिओ कंपनीचा स्वस्तातील स्मार्टफोन ‘जिओफोन नेक्स्ट’साठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. हा फोन दिवाळीच्‍या सुमारास उपलब्ध होणार असल्याचे जिओ व गुगलने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा: ममतांविरोधात मैदानात उतरलेल्या प्रियंका म्हणतात; 'ममतांना...'

जगातील सर्वांत स्वस्तातील स्मार्टफोन असा दावा करीत गणेश चतुर्थीला तो बाजारात आणण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केली होती. गुगलच्या सहकार्याने तयार होणाऱ्या या फोनसाठी आवश्‍यक असलेल्या ‘सेमीकंडक्टर’चा तुटवडा आंतरराष्ट्रीय पातळीवर असल्याने ‘जिओफोन नेक्स्ट’ साठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा: राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी MIM खासदार ओवैसींवर गुन्हा

या फोनच्या चाचण्या मर्यादित वापरकर्त्यांबरोबर सुरू झाल्या आहेत. या चाचण्यांद्वारे फोनमध्ये आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. त्यामुळे हा मोबाईल दिवाळीत उपलब्ध केला जाईल. हा अवधी वाढविल्याने जगभरातील कंपन्यांना भासणारी ‘सेमीकंडक्टर’ची समस्याही कमी होण्यास मदत होईल, असेही त्यात नमूद केले आहे.

loading image
go to top