फास्टॅग रिचार्ज करताना लक्षात ठेवा 'या' गोष्टी, नाहीतर लागेल 5 हजारांचा चुना

फास्टॅग रिचार्ज करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
Fastag
FastagSakal

Fastag Recharge: टोल नाक्यावरील लांबलचक रांगांपासून सुटका करून वाहतूकीचा वेळ वाचवण्यासाठी सरकारने फास्टॅग सुरू केला होता. फास्टॅग (Fastag) ही एक अशी प्रणाली आहे ज्यामध्ये वाहन थांबवल्यानंतर तुम्हाला रोख टोल भरावा लागत नाही. टोलनाक्यांवरील स्कॅनरच्या मदतीने फास्टॅग स्कॅन केला जाईल आणि टोलचे पैसे तुमच्या अकाउंटवरून आपोआप वजा होतील. फक्त तुम्हाला फास्टॅग रिचार्ज करावे लागेल.

फास्टॅग रिचार्ज करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही असे न केल्यास तुमच्या बँक खात्यातून पैसेही कापले जातील आणि रिचार्जही होणार नाही. पेटीएम, फोनपे वरून फास्टॅग रिचार्ज करण्यापूर्वी तुम्हाला वाहन क्रमांक टाकावा लागेल. वाहन क्रमांक चुकीचा असल्यास, तुमच्या बँक खात्यातून पैसे कापले जातील आणि फास्टॅग रिचार्ज देखील होणार नाही.

Fastag
FASTags पद्धती संपुष्टात येणार, भारतात लवकरच 'सॅटेलाईट टोल'

तसेच, तुमचा फास्टॅग कोणत्या बँकेशी लिंक आहे हे लक्षात ठेवणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. फास्टॅग नक्कीच कोणत्या ना कोणत्या बँकेशी जोडलेला असाल. जर तुम्ही पेटीएमवर रिचार्ज करायला गेलात तर सर्वप्रथम तुम्हाला बँकेशी संबंधित प्रश्न विचारला जातो. बँकेचे योग्य तपशील प्रविष्ट केल्यानंतरच तुमचे रिचार्ज शक्य होईल. येथे चुकीची माहिती टाकले तर तुमच्या बँक खात्यातील पैसे गेलेच म्हणून समजा.

Fastag
टोल नाक्यावर अजब प्रकार! Fastag बंदच्या नावखाली होेतेय लूट

काय आहेत फास्टॅगचे फायदे-

दरम्यान, FASTag वापरकर्त्यांसाठी ही माहिती तितकीच महत्त्वाची आहे की त्यांच्या FASTag खात्यात पैसे नसल्यास आणि त्यातून टोल भरला न गेल्यास तुम्हाला दुप्पट शुल्क द्यावे लागेल. अशा परिस्थितीत, FASTag वापरकर्त्यांना सल्ला दिला जातो की त्यांनी वेळोवेळी पेटीएम किंवा इतर प्लॅटफॉर्मवर त्यांच्या FASTag खात्यातील शिल्लक तपासत राहावे आणि जर पैसे कमी असल्यास त्वरित रिचार्ज करा.

तसेच जर तुमच्याकडे FASTag नसेल तर तो तुमच्या कारमध्ये लावा आणि रिचार्ज करून ठेवा, अन्यथा तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com